Header Ads Widget

12 ऑगस्ट पासुन रानभाजी महोत्सव

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व श्री शिवाजी कृषि महाविद्यालयाच्यावतीने दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी श्री. शिवाजी कृषि महाविद्यालयाच्य सभागृहामध्ये जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव आयोजीत करण्यात आला. आरोग्यासाठी रानभाज्यांचे महत्व असुन त्याची विपणन साखळी निर्माण करण्यासाठी दरवर्षी दि. 9 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधित रानभाजी महोत्सव आयोजीत करणेबाबत शासनाच्या सुचना आहेत.

    रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. शिवाजी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य, नंदकिशोर चिखले, श्री. शिवाजी कृषि महाविद्यालयाचे प्राध्यापक,आर. के. पाटील, कृषि विज्ञान केंद्र दुर्गापुरचे वरीष्ठ शास्त्रज्ञ, के. पी. सिंग, जि.प कृषि विकास अधिकारी जी. टी. देशमुख, कृषि विज्ञान केंद्र घातखेडचे विषय विशेषज्ञ, डॉ. प्रणिता कडु, गृहविज्ञान शाखा, कृषि विज्ञान केंद्र दुर्गापुरच्या विषय विशेषज्ञ डॉ. अर्चना काकडे उपस्थित होते. प्रास्तावीक जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल खर्चान यांनी केले. उपस्थितांनी रानभाजी स्टॉलला भेट दिल्या आणि रानभाज्यांची माहिती व महत्व जाणुन घेतली.

    रानभाज्यांचे आहारातील महत्व आणि त्याच्या पाककृती याविषयी सादरीकरणाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. महोत्सवामध्ये 71 शेतकरी त्यांचेकडे उपलब्ध असलेले विविध रानभाज्यांचे नमुने घेऊन उपस्थित राहीले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या