- बुलढाण्याच्या लेकीनं
- फडकवला लंडनला झेंडा
- तिचं हे धाडस पाहून
- कित्ता गिरवेल पुढे तांडा
- काॅमवेल्थच्या खेळात
- रोवलं तिनं निशाण
- जिल्ह्यातील जनतेला
- आहे तिचे मोठे भूषण
- कळंबेश्वर या गावाचं
- नाव इतिहासात गाजलं
- ढोल ताशाच्या गजरात
- देशाचं नाव मोठं वाजलं
- चक्क गौरीची मैदानावर
- तळपली शिवबा तलवार
- खेचून आणला विजय
- आपल्याकडे अलवार
- अथांग जनसमुदाय समोर
- खेळला दमदार खेळ
- तिरंगा फडकवण्याची
- तिनं अचूक साधली वेळ
- तिच्या या कामगिरीला
- करू आपण सलाम
- मान उंचावली जिल्ह्याची
- आनंदीत जनता तमाम
- -पी के पवार
- सोनाळा बुलढाणा
- ९४२१४९०७३१