- सोडुनिया अभिमान
- व्हावे आंधळ्याची काठी
- नाही देहाचा भरोसा
- बोल गर्व कशासाठी ?
- चार हातांची कबर
- नाशिवंत देहासाठी
- गगनचुंबी ईमारत
- तुला हवी कशासाठी ?
- नसे पोटावीन जीव
- राबतोय पोटासाठी
- दोन भाकरीचे पोट
- धन हाव कशासाठी ?
- येथे ठेऊन तिजोऱ्या
- जाशील ऊघड्या मुठी
- भ्रष्टाचार रे लबाडी
- सांग केली कशासाठी ?
- माझं माझं केलं सारं
- नाही राम नाम ओठी
- नाही पुत्र भार्या संगे
- आप्त मोह कशासाठी ?
- नको स्वार्थ अहंकार
- क्षणभंगुर देहासाठी
- पद, सत्ता,लोभ,माया
- कशासाठी, कशासाठी ?
- -वासुदेव महादेवराव खोपडे
- सहा पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त)
- अकोला 9923488556