Contents hide
- अंधार दूर होता, स्वातंत्र्य हे मिळाले
- हातात हा तिरंगा, आता जिणे कळाले
- वंदून सैनिकांना, गातो खुशाल गाणे
- त्यांच्या पराक्रमाने, वैरत्व हे जळाले
- शेतात राबणारे, सौख्यात आज आहे
- घेण्यास झेप सारे, देशात मुक्त झाले
- लोकोत्तरास देतो, हा मान शांततेचा
- त्यांच्यामुळेच वैरी, सारेच ते पळाले
- होणार काय येथे, आता गुलाम कोणी
- मार्गात मित्रतेच्या, सारे इथे वळाले
- हे भाग्य थोर माझे, मी बाळ भारताचा
- गर्वात राहणारे, येथोनिया पळाले
- शब्दसखा- अजय रमेश चव्हाण,
- तरनोळी, ता. दारव्हा, जि. यवतमाळ
- मो.८८०५८३६२०७
- (Images Credit : Loksatta)