Contents hide
- स्वातंत्र्या,
- तुझा जयजयकार करण्यापेक्षा
- तू माझ्या हृदयात कोरलाआहे..
- तू तर कामगार व शेतकऱ्यांच्या
- घामाने फुलला आहे..
- हर घर तिरंगा लावून
- स्वातंत्र्य तुझे रक्षण होणार नाही.
- सत्तेच्या भोगविलासानी
- स्वातंत्र्य तर गुलाम केले आहे…
- इथला हर इव्हेंट
- नफाखोरीचा आहे.
- देशाला विकण्याचा हाच
- तर खरा घाट आहे…
- तिरंग्या तू तर
- देशाची शान आहे.
- सैनिकांची तू
- महाऊर्जा आहे..
- दुश्मनाला खापरे भरणारा
- तू महाज्वाला आहे ..
- म्हणून स्वातंत्र्या,
- तुझा जयजयकार करण्यापेक्षा
- तू साऱ्या भारतीयांच्या
- हृदयात कोरला आहे ..
- संविधानिक लोकशाहीचा
- खरा प्रकाशदीप ठरला आहे…
- – संदीप गायकवाड
- नागपूर
- 9637357400