Contents hide
- स्वातंत्र्याचा दिन।उगवला आज ॥
- सजला हा साज ।भारतात ॥ १ ॥
- स्वातंत्याचा आज I अमृत उत्सव ॥
- भव्य महोत्सव । भारतात ॥ २॥
- उगवला आज । सूवर्णाचा दिन ॥
- अमृताचा क्षण । भारतात ॥ ३ ॥
- करती साजरा । राष्ट्रीय हा सण ॥
- देशाचा सन्मान । चोहिकडे ॥ ४ ॥
- गात आहे मुलं । स्वातंत्र्याचे गीत ॥
- देशाचे संगीत । भारतात ॥ ५ ॥
- तोरणे पताका । कार्यालयी शाळा॥
- कुसुमांच्या माळा । शूरवीर ॥ ६ ॥
- तिरंग्याचा मान । राखू आम्ही सारे ॥
- आनंदाचे वारे । चोहिकडे ॥ ७ ॥
- नियम पाळून । घरो घरी झेंडा ॥
- आनंदाने झेंडा । फडकवू ॥ ८ ॥
- भारताचा आज । सोहळा अमृत ॥
- स्वातंत्र्याची ज्योत । पेटतसे ॥ ९ ॥
- पंधरा ऑगस्ट । हाची शुभ दिन ॥
- ठेवू या ही जाण । भारतीय ॥ १० ॥
- संघर्ष करूनी । रणात लढले ॥
- हुतात्मे ते झाले । देशासाठी ॥ ११ ॥
- मला अभिमान । झेंडा माझा प्राण ॥
- स्वातंत्र्याचे गाण । गाऊ सर्व ॥१२ ॥
- स्वातंत्र्य वीरांचे । कार्य आहे थोर ॥
- उपकार थोर । देशावर ॥ १३ ॥
- स्वातंत्र्यवीरांचा । आम्हा अभिमान ॥
- दिले बलिदान । देशासाठी ॥ १४ ॥
- आमचा हा देश । आम्ही या देशाचे ॥
- आम्ही भारताचे । नागरिक ॥ १५ ॥
- विविधतेतही । असे अखंडता ॥
- नांदते एकता । भारतात ॥ १६ ॥
- देशभक्तीपर । गीतांचे गायन ॥
- मधुर वादन । स्वातंत्र्याचे ॥ १७॥
- मांगल्य देशाचे । टिकवून ठेऊ ॥
- शहिदांचे गाऊ । क्रांतिगीत॥ १८॥
- उंच हिमालय । सरिता सागर ॥
- विशाल भूधर । भारताची ॥ १९॥
- अनेक असती । धर्म,पंथ,जाती ॥
- भारतात नाती । एकतेची ॥ २० ॥
- नव भास्कराचा । भारत अमुचा ॥
- नररत्नांचा हा । देश माझा ॥ २१ ॥
- आहे अभिमान । शूर नि वीरांचा ॥
- शूर शहिदांचा । भारताच्या ॥ २२॥
- स्वातंत्र्याचे आम्हा । दर्शन घडले ॥
- खूपच लढले । शूरवीर ॥ २३॥
- भारतीय आम्ही । गाऊ शहिदांचे ॥
- गीत स्वातंत्र्याचे । आनंदाने ॥ २४ ॥
- भारताचा आम्हा । आहे अभिमान ॥
- अमृता समान । देश माझा ॥ २५ ॥
- स्वातंत्र्यवीरांनी । गुलामगिरीच्या ॥
- बेड्या जुलुमाच्या । बंधमुक्त ॥ २६ ॥
- मुक्ती संग्रामात । अर्पियले प्राण ॥
- मुखातून गाणं । स्वातंत्र्याचे ॥२७ ॥
- लोकशाही देश I महान विश्वात ॥
- सन्मान जगात । भारताचा ॥ २८ ॥
- आम्हा अभिमान । थोर संविधान ॥
- भारत महान । .जगतात ॥ २९ ॥
- स्वातंत्र्याच्या दिनी।अमृताच्या दिनी ॥
- वंदन करांनी । हुतात्म्यांना ॥ ३० ॥
- – प्रा .अरुण बाबारावजी बुंदेले,
- रुक्मिणी नगर ,अमरावती
- भ्रमणध्वनी :८०८७७४८६०९