• Sat. Jun 3rd, 2023

श्रावण मासी

  श्रावण मासी, न हर्ष मनासी
  कुठे कुठेच, हिरवळ दिसे !
  धो धो पाऊस,ढग फुटी होई
  सारेच रान, पाण्यात वसे !!
  सर सर शिरवा, रिमझिम नाही
  थेंब मोत्यांचे, श्रावण सर !
  धो धो पाऊस, पडे सारखा
  नभ कोसळे, धरणी वर !!
  काळे सावळे, मेघ नभि
  ना नाचे मोर, हिरव्या रानी !
  नाग वारुळी, पूजना साठी
  नाही दिसल्या, सख्या सजणी !!
  तरु शिखरांवर, उंच घरांवर
  सदा सर्वदा, अंधार दिसे !
  चंद्र तारे, नभी दिसेनात
  सूर्यदेव कैसा, लपून बसे !!
  रव मंजुळ, किलबिल नाही
  नसे मंदिरी, टाळांची किणकिण !
  सृष्टी अतिवृष्टीने,स्वर हरवले
  झाले सजीव, सारेच भिनभिन !!
  असा कसा हा, श्रावण देवा
  आबाल वृद्ध, सारेच वेडेपिसे !
  श्रावण मासी, न हर्ष मनासी
  कुठे कुठेच, हिरवळ दिसे !!
  वासुदेव महादेवराव खोपडे
  सहा पोलीस उपनिरीक्षक(सेवानिवृत्त)
  अकोला 9923488556
  (Images Credit : Lokmat)

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *