- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : माजी सैनिक , विधवा पत्नी तसेच त्यांच्या पाल्यांच्या गौरवासाठी देण्यात येणाऱ्या विशेष गौरव पुरस्कारासाठी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविले आहेत.
Contents hide
विशेष गौरव पुरस्कारासाठी इयत्ता दहावी व बारावीमध्ये 90 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त झालेले विद्यार्थी तसेच ज्या पाल्यांचा चालू वर्षात आय.आय.एम. आय.आय.टी., ए.आय.आय.एम.एस. तसेच कोणत्याही क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अशा सर्व माजी सैनिक, माजी विधवा सैनिक तसेच माजी सैनिक पाल्य यांनी अमरावती जिल्हा सैनिक कार्यालयातून अर्ज प्राप्त करुन 15 सप्टेंबर 2022 पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी केले आहे.