• Mon. Jun 5th, 2023

विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांची वरुडला भेट ; अतिवृष्टीग्रस्त परिसराची पाहणी

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी वरुड येथे मंगळवारी भेट देऊन अतिवृष्टीबाबत उपाययोजनांचा आढावा घेतला. व अतिवृष्टीग्रस्त परिसराची पाहणी केली.

    वरुड तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व यंत्रणांनी सजग राहून कामे करावीत. पंचनाम्याची प्रक्रिया सविस्तर व तपशीलवार करावी. शेतकरी बांधव व अतिवृष्टी बाधितांशी संवाद साधून पंचनाम्याची प्रक्रिया परिपूर्ण करावी. त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी दिले.

    यावेळी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी निवारा केंद्राची पाहणी केली. त्याचप्रमाणे आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी वरुड येथील अतिवृष्टीग्रस्त परिसरात पाहणी करुन नागरीकांशी संवाद साधला. व नुकसानीची माहिती घेतली. उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार गजेंद्र मालठाणे आदी उपस्थित होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *