• Tue. Sep 19th, 2023

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची गोपीनाथ गडाला भेट

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे घेतले दर्शन
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज गोपीनाथ गड या स्थळास भेट देऊन स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

    यावेळी संवाद साधतांना त्यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, श्री. मुंडे माझे चांगले मित्र होते. ते एक लोकनेता होते लोकांना त्यांच्या प्रती स्नेह होता. काही वेळा वैचारिक मतभेद असले तरीही लोकांमध्ये त्यांच्या प्रति आदराची भावना होती, लोकशाही जपणारा उत्तम नेता म्हणून त्यांची ओळख होती, असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी प्रतिपादन केले.

    याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पुष्पगुच्छ, शाल आणि स्मृतिचिन्ह दिले . जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अंबाजोगाईच्या अपर जिल्हाधिकारी मंजुषा मिसकर, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ, ज्येष्ठ नेते दत्ताप्पा इटके, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सामंत, उपाध्यक्ष रमेश कराड, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, वैजनाथ जगतकर, संदीप लाहोटी आदि उपस्थिती होती.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,