• Wed. Jun 7th, 2023

रक्षाबंधन…

  रक्षाबंधनाच्या ।
  हार्दिक शुभेच्छा ॥
  मनस्वी सदिच्छा ।
  सर्वांनाच ॥ १ ॥

  प्रेमाचा हा सण ।
  भाऊ बहिणींचा ॥
  मधुर नात्याचा ।
  रक्षणाचा ॥ २ ॥

  भाऊ बहिणीच्या ।
  प्रेमाचा हा दिन ॥
  आनंदाचा क्षण ।
  जीवनात ॥ ३ ॥

  राखी विश्वासाची ।
  बहीण बांधते ॥
  घट्ट होई नाते ।
  तयांचेच ॥ ४ ॥

  शोभतसे राखी ।
  भाऊंच्या करात ॥
  उजळे ज्योतीत ।
  नातेद्वय ॥ ५ ॥

  भाऊंच्या हृदयी ।
  बहिणीचा मान ॥
  रक्षणाची जाण ।
  होत असे ॥ ६ ॥

  असे सोबतीला ।
  सुखात दुःखात ॥
  दुःखावर मात ।
  करितसे ॥ ७ ॥

  राखी पौर्णिमेला ।
  रेशमाचे धागे ॥
  बंधूप्रेम जागे ।
  बंधनाने ॥ ८ ॥
  -प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
  रुक्मिणी नगर, अमरावती .
  भ्र ध्व. : ८०८७७४८६०९.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *