मोर्शी तालुक्यामध्ये वाणिज्य विज्ञान शाखेतील प्रवेशाकरीता वाढीव जागांची परवानगी देण्याची मागणी

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
  * डोनेशन च्या नावाखाली खंडणी उकळण्याऱ्या महाविद्यालयांवर कार्यवाही करा !

  * राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी !

  मोर्शी तालुका प्रतिनिधी : शिक्षण विभागाने मोर्शी तालुक्यातील भारतीय महाविद्यालय व आर आर लाहोटी महाविद्यालयांमध्येही जागा वाढवण्या बाबत निर्णय घेण्यात यावा, वाणिज्य व विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास न देता डोनेशन न घेता अकरावीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी मोर्शी तालुक्यातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी दिला आहे.

  २०२२ – २०२३ या शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात चांगल्या गुणवत्तेने दहावीच्या परीक्षेत उतीर्ण झाले आहे. मोर्शी तालुक्यामध्ये शेकडो विद्यार्थी पास झाले असून सुद्धा मोर्शी तालुक्यातील भारतीय महाविद्यालय व आर आर लाहोटी कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये मोजक्याच जागांना परवानगी मिळाली असून या दोन्ही महाविद्यालयामध्ये ११ वि कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्या असल्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळत असल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. मोर्शी तालुक्यातील दोन्ही महाविद्यालयांना मोजक्याच जागांची परवानगी असून आजही शेकडो विद्यार्थी प्रवेशासाठी मोर्शी येथील दोन्ही महाविद्यालयाचे उंबरठे झिजत असल्यामुळे मोर्शी तालुक्यातील विद्यार्थी व पालकांची चांगलीच दमछाक होतांना दिसत आहे

.

  शासन निर्णयानुसार काही तुकड्या विना अनुदानित तत्वावर चालवल्या जात आहेत. तरी विद्यार्थांना चांगल्या दर्जाचे शिक्षण व त्यांच्या हक्काच्या सोयी सुविधा व त्यांना मिळणाऱ्या शैक्षिणक सवलती, त्यांचे सरक्षण, मुख्यतः विद्यार्थिनीना संरक्षण, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व फी माफी वेळेवर मिळाली पाहिजे. परंतु प्रवेश देण्यासाठी काही महाविद्यालयांमध्ये सर्व नियम पायदळी तुडवत पालकांकडून डोनेशन च्या नावाखाली खंडणी उकळण्याचा धंदा राजरोसपणे चालु असून तो तात्काळ बंद करावा अशी विद्यार्थी हिताची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केली आहे.

  यावर्षी ११ वि वाणिज्य विज्ञान शाखेच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र तुकडी निर्माण करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केली आहे. वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय सरकारनं घ्यावा. विशेष म्हणजे अकरावीच्या प्रवेशाबाबत कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही याची काळजी शिक्षण विभागाने घ्यावी मोर्शी तालुक्यातील एकही विद्यार्थी, विद्यार्थिनी अकरावी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची काळजी शिक्षण विभाग, शिक्षण संस्था व शासनाने घ्यावी अश्या मागणीचे निवेदन शिक्षणाधिकारी, उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, गट शिक्षणाधिकारी यांना दिले असून प्रवेशापासून वंचित राहिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना सोबत घेऊन शिक्षणाधिकार्यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंकुश घारड, मयूर राऊत, शुभम तिडके, रोशन राऊत, सौरभ काळे, घनश्याम कळंबे, अमोल केचे, शुभम पकडे, धीरज महल्ले यांनी दिला आहे.