Contents hide
- असा सकायी सकायी
- कोन आला माया दारी
- ह्या तं माहेरचा भाऊ
- आला वासुदेव घरी
- माया माहेरच्या दादा
- माया निरोप तू नेजो
- माया घरची खुशाली
- माय-बापाले सांगजो
- सुखी हाये मना इथं
- तुया कायजाचा गोया
- माहेराले न्यायासाटी
- जाऊ देजो मना पोया
- आसवाचे गुनगान
- नोको सांगजो मायले
- आता सवयच झाली
- रोज वायत्या डोयाले
- तुई लेक मना इथं
- रानी बनून नांदते
- सुगी कबाळकष्टाची
- इथं बारोमास येते
- नाई मारत दादला
- नाई बोलत सासरा
- सासू मायवानी पाहे
- हाती घराचा कासरा
- माया बापाले सांगजो
- हट सोळले पोरीनं
- आता करू नोय आशा
- गाय ईकल्या बापानं
- मांडवाले गेला मना
- माया संसाराचा येल
- चिंता नोको करू मना
- हाये सारं आलबेल
- माया दादाले सांगजो
- लवे डोयाची पापनी
- तुई याद येते तवा
- होते मनाची चायनी
- माया बैनीले सांगजो
- घेजो कायजी बापाची
- नाक कटू नोको देजो
- लाज जपजो घराची
- -अरुण विघ्ने