• Mon. Jun 5th, 2023

माझ्या बहिणाईची गाणी…

  माझ्या बहिणाईची गाणी |
  काव्य मराठीस देती संजीवनी ||
  गावातील मंदिरे ह्याच होत्या शाळा |
  गाणी रचुनी फुलविला काव्य मळा ||
  गाणी बहिणाईची वाहता गंगेचा पाट |
  मना लावी जिव्हाळा शब्द मधुर दाट ||
  गाणी जुन्यात चमकती बहिणाईची |
  कानी नव्याने पडती ओवी अहिराणीची ||
  माती,मातीत पेरिलं अनमोल शब्दधन |
  बोली अहिराणीत भरलं हे काव्यधन ||
  माझ्या बहिणाईच्या गाण्यात निसर्ग प्रतिमा झिरपते |
  ओव्या वाचता, वाचता त्यातुनी मज बहिणाई दिसते ||
  -प्रविण खोलंबे.
  ता.मुरबाड तालुका
  संपर्क- ८३२९१६४९६१

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *