• Sat. Jun 3rd, 2023

माझी शेती माझा सातबारा, माझा पिक पेरा नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा -तहसीलदार सागर ढवळे

    * ई-पीक पाहणी नोंदविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी मोर्शीचे तहसीलदार शेतकऱ्यांच्या बांधावर
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    मोर्शी (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना सातबारावर पिकाची अचूक माहिती भरण्यासाठी राज्य सरकारने ई-पीक पाहणी ॲप सुरू केले आहे. महसूल आणि कृषी विभागातर्फे संयुक्तपणे हा उपक्रम राबविला जात आहे. माझी शेती माझा सातबारा, माझा पिक पेरा यासाठी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पीक पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. मोर्शी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये ई-पीक पाहणी ॲपला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

    मोर्शीचे तहसीलदार सागर ढवळे स्वतः मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीच्या बांधावर जाऊन ई-पीक पाहणी नोंदविण्याचे प्रशिक्षण देत असून त्यांच्या अधिनस्त असणारी संपूर्ण यंत्रणा दैनंदिन विविध शेतातील बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. शेतकऱ्यांना रब्बी पिकाचा पिक पेरा भरण्यासाठी मोबाईलद्वारे ई पिक पहाणी ॲप वर रब्बी पिका चा पेरा भरण्याची सुविधा देण्यात आली असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन तहसील सागर ढवळे यांनी केले आहे. या ॲपमुळे आता शेतकऱ्यांना तलाठ्या कडे जाण्याची गरज राहणार नाही नसल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पीक पेरा भरण्याचे मार्गदर्शन तहसीलदार सागर ढवळे यांनी शेतकऱ्यांना केले यावेळी या कार्यक्रमाला तहसीलदार सागर ढवळे, तलाठी राधेश्याम राऊत, ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, यांच्यासह दापोरी परिसरातील शेतकरी व महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

    मोर्शी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी चालू वर्षीच्या रब्बी हंगामातील पीक पेरा स्वतः ई पीक पाहणी ॲपवरून आपापल्या शेतात पेरणी केलेल्या रब्बी पीकांचा पेरा भरावा. ऑनलाइन पध्दतीने पीक पेरा भरता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने पथदर्शी स्वरूपात ई पीक पाहणी प्रकल्प राबवण्यास मान्यता दिली आहे. अत्यंत सोप्या पद्धतीने या ॲप चा वापर करून शेतकऱ्यांना स्वतः पीक पेरा भरता येणार आहे. यासाठी गावांत कोणाकडेही उपलब्ध असलेल्या अँड्रॉइड मोबाईल ची आवश्यकता असून एका मोबाईल वरून 20 शेतकऱ्यांना आपापला पीक पेरा अपडेट करता येणार आहे. ॲप कसे वापरावे यासाठी आवश्यक माहितीचे मॅन्युअल व्हाट्सअपच्या माध्यमातून तलाठी व कृषी सहायक यांनी गावात उपलब्ध करून दिले असून तहसीलदार सागर ढवळे यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर प्रशिक्षण देत आहे. यासाठी प्रत्येक गावस्तरावर एक नोडल अधिकारी म्हणून तलाठी अथवा कृषी सहायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सदर प्रशिक्षणास उपस्थित राहून त्यात दिलेल्या सूचनेनुसार आपापल्या शेतात चालू रब्बी हंगामात पेरणी केलेल्या पिकांचा पेरा ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे, याप्रमाणे ॲप वर काम करत असताना कोणतीही अडचण आल्यास गावस्तरावरील नोडल अधिकारी यांचेकडून तात्काळ फोनवरून मार्गदर्शन घ्यावे तालुक्यातील रब्बी पिकांची पेरणी केलेल्या सर्व शेतकरी बांधवांनी सदर ॲप च्या माध्यमातून लवकरात लवकर रब्बी पीक पेरा अद्ययावत करून सदरचा प्रकल्प तालुक्यात यशस्वी करावा असे आवाहन तहसीलदार सागर ढवळे यांनी केले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *