• Wed. Jun 7th, 2023

महिला सबलीकरणाकरिता “स्त्री सन्मान” उपक्रम

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त महिलांच्या सबलीकरणाकरिता “स्त्री सन्मान” हा एक नाविन्यपूर्ण व सर्वसमावेशक उपक्रम जिल्हा परिषद अमरावती, उमेद व स्त्री सन्मान फाऊंडेशन अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत आहे.समाजातील गरजू, उद्योजक महिला व महिला बचत गट यांना आर्थिक, सामाजिकरित्या भक्कम करण्याची काळाची गरज आहे त्याअनुषंगाने डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या धर्तीवर स्त्री सन्मान फाउंडेशन मार्फत नाविन्यपूर्ण मॉडेल तयार करण्यात आलेले आहे.

    स्त्रियांमध्ये असणारे कला गुण संपन्नता आणि अद्भुत क्षमता या गुणांचा योग्य प्रकारे वापर केल्यास आर्थिक उन्नतीसाठी नवीन संधी उपलब्ध करण्यात येणार आहेत. अश्या महिला बचत गटांचे, उद्योजक महिलांचे गुणवत्तापूर्ण उत्पादन/ वस्तू गाव खेड्यापासून ते शहरापर्यंत आणि शहरापासून विदेशापर्यंत पोहचवण्यात “स्त्री सन्मान” हे मॉडेल उपयुक्त ठरणार आहे.

    मॉडेलचा शुभारंभ जि. प. सीईओ अविष्यांत पंडा, प्रकल्प संचालक प्रीती देशमुख, संभव वि. इंगोले व सारंग शरद विधळे व उमेद तर्फे सचिन देशमुख यांच्या उपस्थितीत दि. 14 ऑगस्ट 2022 रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे दुपारी 3 वा. करण्यात येणार आहे. तसेच याच निमित्ताने दि. 13,14 आणि 15 ऑगस्ट 2022 रोजी भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

    या प्रकल्पाच्या माध्यमातून फिजिकल आणि डिजिटल या दोन्ही स्वरूपांमध्ये कार्य करून स्त्रिया जे काही नाविन्यपूर्ण वस्तू तयार करतात त्यांना सुयोग्य तसेच विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन त्यामध्ये अधिक गुणवत्ता कशी करता येऊ शकते हे सर्व निदानात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे. फिजिकल या प्रकारामध्ये महिलांसाठी “स्त्री सन्मान स्टोअर्स” सर्व तालुक्यांमध्ये व जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. तसेच गाव खेड्यापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा शहरांमध्ये असणाऱ्या वर्दळीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी “स्त्री सन्मान ऑन व्हील्स” अश्या विविध उपाययोजना करून देण्यात येणार आहेत. डिजिटल या प्रकारामध्ये उपलब्ध उत्पादन अधिक सोयीस्कर रित्या ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ई-कॉमर्स या माध्यमाचा उपयोग होणार आहे. यामध्ये वेबसाईट, मोबाइल एप्लीकेशन व इतर उपलब्ध माध्यमांचा उपयोग करून देण्यात येणार आहे. वेबसाईटच्या माध्यमातून शासकीय योजना तसेच महत्वपूर्ण गरजेची संपूर्ण माहिती वेळोवेळी अतिशय सोप्या पद्धतीने पोहोचवण्यात येईल. महिलांच्या असणाऱ्या समस्यांसाठी टोल फ्री नंबर हा सुद्धा देण्यात येणार आहे. महिलांना तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करावा व आपण सहज माध्यमातून काम कसे करावे याबाबत तंत्रसहाय्य व मार्गदर्शन सुद्धा “स्त्री सन्मान” मार्फत करण्यात येणार आहे.

    स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्त्री सक्षमीकरणाचे नवे पाऊल टाकण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. समाजासाठी काहीतरी करण्याची संधी प्रत्येकाला गरजेची असते व तो मार्ग आपल्याच माता-भगिनींसाठी “स्त्री सन्मान” मार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *