महानगरपालिकेत सदभावना दिवस प्रतिज्ञेचे वाचन

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : गुरुवार दिनांक १८ ऑगस्‍ट,२०२२ रोजी सदभावना दिवस प्रतिज्ञेचे वाचन कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्‍न झाले. माजी पंतप्रधान स्‍व. राजीव गांधी यांचे प्रतिमेस महानगरपालिका आयुक्‍त डॉ.प्रविण आष्‍टीकर यांचे हस्‍ते हारार्पण महानगरपालिका कॉन्‍फरन्‍स हॉलमध्‍ये करण्‍यात आले. तसेच माजी पंतप्रधान स्‍व. राजीव गांधी यांचे प्रतिमेस हारार्पण कार्यक्रम झाल्‍यानंतर सदभावना दिवस प्रतिज्ञेचे सामुहीक वाचन करण्‍यात आले.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    सदर कार्यक्रमास उपायुक्‍त भाग्‍यश्री बोरेकर, उपायुक्‍त डॉ.सिमा नैताम, सहाय्यक आयुक्‍त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ.विशाल काळे, तांत्रिक सल्‍लागार जिवन सदार, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, अभियंता राजेश आगरकर, महानगरपालिका संघटनेचे सरचिटणीस प्रल्‍हाद कोतवाल, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.