Contents hide
- खरचं
- भारतीय स्वातंत्र्या
- भारत माझा देश आहे कारे ?
- गेल्या 75 वर्ष्यात
- ना माझ्या आज्याले गावला
- ना बापाला दिसला
- मी ही शोधतो आहे
- गेल्या कित्येक दशकापासून
- माझा भारत देश
- सुजलाम सुफलाम
- कुठं काहीच नाही
- शोधून शोधून
- दिसतो मला उघडा नागडा
- महानगराच्या पाईपलाईन
- जवळ
- रेल्वेच्या पूलाखाली
- देवळाच्या पायथ्याशी …
- रोजी विना
- उपाशी
- हे माझ्या प्राणप्रिय
- भारता
- इथं शाळा आहे तर
- शिक्षक नाही
- गुन्हेगाराला शिक्षा
- नाही
- भारत माता की
- जय म्हणतात
- बापाचा पत्ता नाही
- खरच भारतीय स्वातंत्र्या
- तुला शोधून थकलो रे
- न्याय मागतो
- तर देशद्रोही ठरतो
- लढतो तर
- एकटा पडतो
- व्यवस्थेच्या नजरेत
- भरतो
- लुच्चे लफांगेचे
- राज आहे
- नसानसात माज आहे
- भारतीय स्वातंत्र्या
- चायवाला रिक्षावाला
- सुपारी घेणारा
- तुझा अमृतमहोत्सव
- साजरा करणार आहे
- आमच्या हातात झेंडा
- गुंडा माल लपेटणार आहे …
- -राजेंद्र क.भटकर
- बडनेरा