• Fri. Jun 9th, 2023

भव्य सायकल रॅलीचे थाटात उद्घाटन

  * स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय महाविद्यालय अमरावती आयोजित भव्य सायकल रॅलीचे थाटात उद्घाटन
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : भारतीय विद्या मंदिर द्वारा संचालित भारतीय महाविद्यालय अमरावती, राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने प्राचार्य डॉ. आराधना वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली मूकबधिर महाविद्यालयात शालेय साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना झेंडा वाटप, पोस्टर प्रदर्शनी, अमरावती शहरातील भव्य पायदळ रॅली मध्ये सहभाग, तसेच भव्य सायकल रॅली काढून पर्यावरण संवर्धन करण्यासाठीचे समाजाला संदेश देण्यात आले.

  दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ८:०० वाजता “हर घर तिरंगा” या अभियानांतर्गत “भव्य सायकल रॅली” भारतीय महाविद्यालय, अमरावती येथून काढण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. अलका गायकवाड, प्राध्यापक, मराठी विभाग प्रमुख, प्रमुख उद्घाटक मा. डॉ. केशव तुपे (सह-संचालक) उच्च शिक्षण विभाग अमरावती. प्रमुख उपस्थिती डॉ. तुषार देशमुख (कुलसचिव), सगाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, तसेच विशेष उपस्थिती मा. डॉ. श्रीकांत पाटील (संचालक), आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, सगाबा अमरावती विद्यापीठ, प्रा. डॉ. प्रवीण रघुवंशी (सिनेट सदस्य), सगाबा अमरावती विद्यापीठ, डॉ. सतीश कुळकर्णी, डॉ. राजकुमार दासरवाड, समाजकार्य महाविद्यालय बडनेरा, या सर्व मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी वरील मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून “सायकल रॅली” चे थाटात करण्यात आले.

  कार्यक्रमाचे आयोजक डॉ. प्रशांत विघे, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना भारतीय महाविद्यालय अमरावती यांनी केले. या भव्य सायकल रॅली मध्ये शहरातील सायकल प्रेमी श्री. दीपक आत्राम, यांनी सायकल वापरण्याचे फायदे सांगून सर्व नागरिकांनी सायकलचा प्रवास करावा असे आवाहन आत्राम यांनी केले. अमरावती शहरातील विविध महाविद्यालयातील १२० पेक्षा जास्त प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

  सायकल रॅली दरम्यान डॉ.अनिल खांडेकर, डॉ. नितीन तट्टे, डॉ. मीता कांबळे, दीपलक्ष्मी कुळकर्णी, डॉ. संगीता कुळकर्णी, डॉ. अमरीश काळीकर, डॉ. दया पांडे, डॉ. संगीता देशमुख, डॉ. विनोद कल्याणवार, डॉ. आम्रपाली वासनिक, डॉ. मीना डोईबोले, प्रा. ऋषभ डहाके, डॉ. वैशाली बिजवे, डॉ. मीना दवांडे, डॉ.सुमेध वरघट, सह-कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. स्नेहा जोशी, महिला कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. पल्लवी सिंग, सह-महिला कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार श्री. राजेशजी पिदडी यांनी मानले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *