- हसत मजा मस्ती करत
- कधी आलो शाळेबाहेर रडत
- याची जाणीव कधीच नाही भासली
- बघता बघता बारावी ही संपली
- कधी Online तर कधी Offline कॉलेज
- काहीच भेटलं नाही यात विद्यार्थ्यांना Knowledge
- अकरावीची थोडी पायरीच चढली
- बघता बघता बारावी ही संपली
- ना दिसला गोंधळ ना चिवचिवाट
- आता निवडायची तरी कोणती वाट
- नेहमीच मनी येते हि प्रश्नावली
- बघता बघता बारावी ही संपली
- कोरोनाने दिला काहींना माणुसकीचा धडा
- पण रीता ठेवला आमच्या शिक्षणाचा घडा
- विषयाची ओळख करून घेण्यातच वेळ गेली
- बघता बघता बारावी ही संपली
- Physics , Bio , Chemistry
- वेळ गेला जानण्यात यांची History
- त्यात भूगोल, इंग्लिश, मराठी हि आली
- बघता बघता बारावी ही संपली
- -कु : स्नेहा शिवाजी जाधव