प्लास्टिक जप्‍ती व डस्टबिन बाबत धडक मोहिम

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : मा.आयुक्त व मा.उपायुक्त (सा.) डॉ.सिमा नैताम यांच्या आदेशानुसार व सहाय्यक आयुक्त झोन क्र.३ यांच्या निर्देशानुसार दि.२२/०८/२०२२ रोजी पुर्व झोन क्र.३ दस्तुरनगर अंतर्गत येणाऱ्या वडाळी नाका व चांदुर रेल्वे रोड परिसरात प्लास्टिक जप्‍ती व डस्टबिन बाबत मोहिम राबविण्‍यात आली.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    दुकानदार, किरकोळ विक्रेता हॉकर्स, आस्थापनाधारक तपासणी दरम्यान त्यांना दोन डस्टबिन ओला व सुका कच-यासाठी वेगवेगळा ठेवण्याबाबत सख्त सूचना देण्यात आल्‍या व १ आस्थापना धारकांकडे ३ कि.ग्रा. नॉनओवन बॅग आढल्याने त्यांना ५००० रुपये दंड करण्यात आला व २ आस्थापनाकडे डस्टबिन नसल्याने त्यांना प्रत्येकी ५०० रूपये प्रमाणे १००० रूपये दंड असे एकूण ६००० रुपये दंड वसूल करण्यात आला. सदर मोहीमेमध्ये जेष्‍ठ स्वास्‍थ निरीक्षक कुंदन हडाले, स्वास्‍थ निरीक्षक शैलेश डोंगरे, पंकज तट्टे, सुमेध मेश्राम, आशीष सहारे, शक्ती पिवाल उपस्थित होते.