पोळा

    आज पोळ्याचा रे सण
    तुझी करू दे आरास
    सवंगड्या तुहया तोंडी
    देतो पुरणाचा घास !!
    कधी ओढला चाबुक
    कधी आरुण टोचल
    माहया जीवासाठी गड्या
    तू जीवावर सोसल !!
    वखर,नांगराच ओझ
    तू ओढल मानेकाठी
    राबराबलो मातीत
    तुहया माहया पोटासाठी !!
    ह्या बेईमान जगात
    कोणी नाही रे आपलं
    तुह्या माह्या जीवनात
    खाणं कष्टाच लिहिलं !!
    मनी डोरल ईकून
    आणली गा झूल,ताज
    किती वाहू छातीवर
    हे उपकाराच ओझ !!
    देव कोपला कोपला
    राजा,दलाल गद्दार
    तुहया माहया जीवनाचा
    कधी होईन उद्धार ?
    -वासुदेव महादेवराव खोपडे
    सहा पोलिस उपनिरीक्षक (सेनी)
    अकोला 9923488556