• Wed. Sep 27th, 2023

पदवीसोबत ‘स्कील डेव्हलपमेंट’ महत्वाचे – किर्ती राजेश अर्जुन

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
  * तक्षशिला महाविद्यालयात पदवीदान वितरण सोहळा
  * प्र. कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांची दिक्षांत भाषक म्हणून उपस्थिती
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : आज आपण येथे नुसती पदवी घेण्यासाठी नाही आलोयं, आज आपण येथे आलोय तर आपले चांगले करिअर बणविण्यासाठी, आपल्याला स्वत:ला घडविण्यासाठी, एक मानवतावादी ह्युमन बिईंग बनविण्यासाठी आणि त्याच्यासोबत आपल्या देशाला घडविण्यासाठी. विद्यार्थ्यांनो, नेहमी लक्षात असू द्या पदवी तर आपल्याला कोणत्याही शाखेत घेता येते पण पदवीसोबतच तुम्हाला ‘स्कील डेव्हलपमेंट’ महत्वाचे आहे” असे उद्गार तक्षशिला महाविद्यालयातील पदवीदान सोहळ्याचे अध्यक्ष किर्ती राजेश अर्जुन यांनी काढले.

  श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टद्वारा संचालित तक्षशिला महाविद्यालयातील पदवीदान सोहळयात त्या बोलत होत्या. पदवीदान सोहळयात व्यासपीठावर अध्यक्षपदी संस्थेचे अध्यक्ष किर्ती राजेश अर्जुन, प्रमुख अतिथी आई डॉ. कमलताई गवई, दिक्षांत भाषक प्र. कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, प्रमुख उपस्थिती संस्थेचे सचिव प्रा. पी.आर.एस. राव, प्राचार्य डॉ. पडवाल मल्लू, प्राचार्य डॉ. अंजन कुमार सहाय, कविता गवई यांची उपस्थिती होती. पदवीदान वितरण सोहळयाची सुरूवात उपस्थित मान्यवरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, स्मृतीशेष गवई यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून केली. तत्पश्चात उपस्थितांनी विद्यापीठ गीत, संस्थागीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पडवाल मल्लू यांनी केले. यावेळी अध्यक्ष किर्ती राजेश अर्जुन यांना पदवी वितरण करण्याची अनुमती प्रा. नवल पाटील यांनी केली. पदवी वितरण सोहळयासाठी तक्षशिला महाविद्यालयातील संपूर्ण सेमिनॉर हॉल सजविण्यात आलेला होता. सोबत मैदानावर पदवीसाठी परिधान करण्यात येणारा गाऊन, कॅप, सेल्फी पाईंटचीही व्यवस्था करण्यात आलेली होती.

  पदवी वितरण समारोहाचे दिक्षांत भाषण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे यांनी केले. ते म्हणाले की, आपल्याला पदवी मिळाली ही जरी अभिमानाची बाब जरी असली तरी सांगतांना मोठे दु:ख होते की १०० पैकी पदवीला नोंदणी करणा:यांची संख्या मात्र ३३ टक्केचं आहे. तुम्हाला जे ज्ञान मिळाल आहे त्याचा वापर समाजोन्नतीसाठी करावा असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. याच कार्यक्रमात डॉ. सनोबर कहेकशा लिखीत ‘ए स्टडी ऑफ डायसपोरा’ या पुस्तकाचे लोकार्पण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.

  आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये प्राचार्य डॉ. मल्लू पडवाल म्हणाले की, खर म्हणजे तक्षशिला महाविद्यालयाची सरूवात आदरणिय आई यांनी १९८४ मध्ये दादासाहेबांच्या प्रेरणेने ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ यासाठी म्हणजेच गोरगरीबांच्या सेवेसाठी केली होती. आज हे महाविद्यालय वटवृक्षामध्ये रूपांतरीत झाले आहे. या महाविद्यालयात एकुण २९१८ विद्यार्थी प्रवेशीत आहेत. येथे सात विषयात पीजी आहे तसेच पाच विषयाचे पी.एच.डी रिसर्च सेंटर आहे. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एम.ए. पाली विषयात सुवर्ण पदक मिळविल्याबद्दल नारायण थोरात, गुणवत्ता यादीत नामांकन मिळविल्याबद्दल रश्मी रंगारी, तेजस्विीनी निचळे यांना सन्मानित करण्यात आले. बी.कॉम मधून अब्दुल साजीद अ. हाफीज, आदेश सोनटक्के, ऋषीकेश निस्ताने, पुजा कोसे, शारदा धुर्वे, बी.ए. जे अँण्ड एम.सी (पत्रकारिता व जनसंवाद) मधून प्रफुल्ल वानखडे, शिवानी ठाकूर, निकीता राऊत, रोहन गुडधे, जयकुमार पुनसे, बी.बी.ए.मधून आदिती गजभिये, प्रतिक्षा पारवे, प्रज्वल रघुते, बी.सी.ए. मधून गायत्री मांजरे, प्रसाद पिंजरकर, स्नेहा मेटकर, दिक्षा डोंगरे, मो. फैजान मो. युसुफ, बी.एस.सी मधून कोमल गवई, प्रितम तरारे, आमिर सोहेल अब्दुल मतीन, वैष्णवी वानखडे, पुजा अंबुलकर, एम. कॉम. मधून नम्रता घरडे, प्रियंका नाईक, आरती उपासे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदवी देण्यात आली.

  पदवी वितरण सोहळयाचे सुत्रसंचालन डॉ. कमलाकर पायस तर उपस्थितांचे आभार डॉ. रविंद्र तायडे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. अंजली वाठ व सहकारी यांनी केले. पदवी वितरण सोहळ्याचे कॅमेरामन म्हणून पत्रकारिता व जनसंवाद विभागातील विद्यार्थी प्रथम गणेश इंगळे, टेक्निशियन म्हणून योगेश मानकर तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गोकुल सोळंके, अरबाज मोनावाले, विशाल दहिकर, तेजस ढोके, मंगेश वाघ, राहुल तरोडकार, राजेश ढंगारे, सुरज नाईक यांनी प्रयत्न केले.

  ——
  आज दादासाहेब असते तर …आई डॉ. कमलताई

  मुलांनो ‘बी’ लावणे हे फार सोपे असते पण त्यांना वाढविणे हे फार कठीण असते. आज संस्थेला वाढविण्याचे काम आपण सर्वच करीत आहात. दादासाहेबांनी लावलेले ‘बी’ हे वटवृक्षात रूपांतर होतांना पाहतांना मला आज खूप आनंद होत असून आज दादासाहेब असते तर त्यांना नक्कीच आनंद झाला असता असे भावनिक उद्गार प्रमुख अतिथी आई डॉ. कमलताई गवई यांनी काढले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,