“द मेलोडियस जर्नी ऑफ किशोर कुमार” कार्यक्रम रविवारी

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    *”सिंफनी ग्रुपचा संगीतमय चॅरिटी शो
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती: सिंफनी ग्रुप ऑफ म्युझिक, कल्चर अँड वेल्फेअर ट्रस्ट गेल्या अनेक वर्षांपासून संगीत, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहे. ही परंपरा कायम राखत सिंफनीने “द मेलोडीयस जर्नी ऑफ किशोर कुमार” या संगीत मैफलीचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता मोर्शी रोडवरील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणार आहे.

    पुणे येथील अनिल घाडगे आणि प्रमोद ढगे, सा रे ग म प लिटिल चॅम्प सह, संगीत सम्राट, झी मराठीसह विविध टीव्ही चॅनेल गाजवणारी वैष्णवी भालेराव कार्यक्रमाचे विशेष आकर्षण राहणार आहे. व्हॉइस ऑफ किशोर कुमार म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती आहे. या कार्यक्रमातून मिळालेली देणगी सामाजिक उपक्रमांसाठी देण्यात येईल. यापूर्वी देखील सिंफनी ग्रुपने पुलवामा शहीद नितीन राठोड आणि संजय राजपूत यांच्या कुटुंबीयांना अशाच एका चारिटी शोच्या माध्यमातून मदत केली होती. सेवाभावी हार्ट फाउंडेशन, वृद्धाश्रम यांनादेखील सिंफनी ग्रुप सहकार्य करीत असतो.

    या कार्यक्रमासाठी देणगी राशी 500 रुपये, 350 रुपये, 250 रुपये आणि 150 रुपये निश्चित केली आहे. बुक माय सीट या ॲपवरून या कार्यक्रमासाठी आपण आपला प्रवेश निश्चित करू शकता. सोबतच संत ज्ञानेश्वर सभागृह येथे 5 ऑगस्ट पासून सकाळी 11 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपण डोनेशन पास अर्थात प्रवेशिका मिळवू शकता. कार्यक्रमाचे संगीत संयोजन सचिन गुडे यांचे आहे. संचालन मुंबई येथील नासिर खान करणार आहेत. ध्वनी व्यवस्था रॉयल साउंडचे रईस भाई यांची आहे. अधिक माहिती आणि प्रवेशिका करिता सचिन गुडे (9822241198), गुरुमूर्ती चावली (9823688468), जयंत वाणे (9822643316), डॉ. नयना दापूरकर (7020266954), सुचिता खुळे (9860031332) यांच्याशी संपर्क साधू शकता. त्याशिवाय कलोती नगर, अमरावती येथील सचिन गुडे यांच्या सिम्फनी स्टुडिओ येथे प्रत्यक्ष भेट देऊ शकता. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून मदत करण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.