• Wed. Jun 7th, 2023

देशातील तरुणांनी नैतिकता जोपासली पाहिजे – डॉ. अलका गायकवाड

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : रेड रिबन क्लब (RRC), राष्ट्रीय सेवा योजना (NSS) भारतीय महाविद्यालय अमरावती, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती व एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र (ICTC) डाँ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने 12 ऑगस्ट 2022 रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन व आजादी का अमृतमहोत्सवा चे औचित्य साधून भारतीय महाविद्यालयातील विद्यार्थानं करिता एच आय व्ही/ एड्स (HIV/AIDS), STI RTI (लैगिंक आजार), रक्तदान व घर घर तिरंगा या विविध विषयांवर मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच पार पडला.

    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. अलका गायकवाड , प्रमुख मार्गदर्शक अजय साखरे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती, प्रमोद मिसाळ समुपदेशक, एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र (ICTC) डाँ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावती, डॉ. प्रशांत विघे ,कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. स्नेहा जोशी कार्यक्रम अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होत्या.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद मिसाळ यांनी केले, प्रास्ताविका मध्ये देश `आजादी` का अमृत महोत्सव साजरा करत असतांना तरुणांनी आपल्या भविष्याबद्दल जागरूकता वाढवणे आवश्यक असून भावी पिढी निरोगी असेल तरच देश प्रगती करू शकतो त्या करीत एच.आय.व्ही./ एड्स सारख्या आजारावर घराघरामध्ये चर्चा करने गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अलका गायकवाड म्हणाल्या की, देशातील तरुणांनी नैतिकता जोपासले पाहिजे, त्यासाठी त्याच् आचरण योग्य असणे गरजेचे आहे. देशातील तरुण जिवंत राहिला तरच देश प्रगती करू शकतो असे मत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे मार्गदर्शक अजय साखरे म्हणाले की, युवकांनी चुकीच्या चालीरीती, चुकीचे खानपान, चुकीच्या सवयी, जोखिमीचे गट या पासून दूर राहिले पाहिजे तसेच एड्स सारख्या आजाराला युवकांनी खतपाणी खालू नये यावर मार्गदर्शन केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वेदिका येरमशेटेवार हिने केले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. प्रशांत विघे कार्यक्रम अधिकारी यांनी केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय युवक दिनाच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *