- *नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्ताने दि. 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत ‘स्वराज्य महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. स्वराज्य महोत्सवातंर्गत आज 17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता संपुर्ण जिल्ह्यात एकाच वेळी राष्ट्रगीताचे सुर निनादले. जिल्ह्याभरात सर्वत्र समूह राष्ट्रगीताचे गायन करुन राष्ट्राला अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज समुह राष्ट्रगीत गायन करण्यात आले. जिल्हाधिकारी पवनीत कौर, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, रणजित भोसले, मनिषकुमार गायकवाड, राम लंके, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, अधीक्षक उमेश खोडके आदी उपस्थित होते. महसुल, निवडणुक, सांख्यिकी, नियोजन व सुचना केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषदा, ग्रामपंचायत, पंचायत समित्यांमध्ये पदाधिकारी, सदस्य, अधिकारी, कर्मचारी व नागरिक राष्ट्रगीत गायनात सहभागी झाले.
समुह राष्ट्रगीत गायनात शासकीय कार्यालये, विद्यापीठ, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, खाजगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, विद्यार्थी, शिक्षक व नागरिक उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. स्वराज्य महोत्सवात स्वच्छता मोहिम, महिला मेळावे, शेतकरी मेळावे, विविध विषयांवरील शिबिरे, वृक्षारोपण व अनेक सांस्कृतिक कार्यक्रम विविध विभागांकडून आयोजित करण्यात आले.