• Mon. Jun 5th, 2023

घर घर तिरंगा कार्यक्रमासाठी महानगरपालिकेला ५००० ध्वज प्रदान

    * चेंबर ऑफ अमरावती महानगर मर्चंट्स अँड इंडस्ट्रीज अमरावतीचा उपक्रम
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : चेंबर ऑफ अमरावती महानगर मर्चंट्स अँड इंडस्ट्रीज अमरावती संलग्न असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या वतीने आयोजित व अमरावती महानगरपालिकेच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दिनांक ९ ऑगस्‍ट,२०२२ रोजी आयोजित तिरंगा कार्यक्रमासाठी महानगरपालिकेला ५००० ध्वज प्रदान करण्यात आले.

    यासोबतच महानगर चेंबरने शहरातील प्रत्येक व्यावसायिक आस्थापनांवर आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या घरी तिरंगा लावण्याचा सविस्तर कृती आराखडा तयार केला आहे आणि १० ऑगस्ट रोजी महानगरपालिकेच्या वतीने काढण्यात येणाऱ्या विशाल रॅलीत सर्व व्यापारी बांधवांना दुपारी ३.०० वाजता नेहरू मैदानावर उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष सुरेश जैन यांनी केले. आज महानगरपालिका आयुक्त डॉ.प्रविण आष्टीकर व महानगरपालिकेतील उपस्थित सर्व अधिकारी यांच्या समक्ष घरोघरी तिरंगा मोहिमेची विधिवत सुरुवात करण्यात आली.

    यावेळी उपायुक्‍त भाग्‍यश्री बोरेकर, उपायुक्‍त डॉ.सिमा नैताम, मुख्‍यलेखाधिकारी हेमंत ठाकरे, शहर अभियंता रविंद्र पवार, सहाय्यक आयुक्‍त योगेश पिठे, नरेंद्र वानखडे, नंदकिशोर तिखिले, श्रीरंग तायडे, नगरसचिव मदन तांबेकर, विधी अधिकारी श्रीकांत चव्‍हाण, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, कार्यालय अधिक्षक संजय दारव्‍हेकर, समाज विकास अधिकारी धनंजय शिंदे, भांडार अधिक्षक मंगेश जाधव, कार्यशाळा उपअभियंता लक्ष्‍मण पावडे, उपअभियंता प्रमोद इंगोले, अभियंता दिपक खडेकार, महानगर चेंबरचे अध्यक्ष सुरेश जैन, सचिव घनश्याम राठी, कोषाध्यक्ष जयंत कामदार, सुरेंद्र पोपली, विरेन्द्र लढ्ढा, शरणपालसिंह अरोरा,बकुल कक्कड़, विनोद सामरा, प्रमोद भरतीया, ओमप्रकाश चांडक, सुनील जांगीड़, सारंग राउत, पप्पू गगलानी, अशोक राठी, महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *