• Wed. Jun 7th, 2023

गणेश विसर्जन स्‍थळांची पोलीस आयुक्‍त व मनपा आयुक्‍त यांनी केली पाहणी

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : प्रथमेश जलाशय, छत्री तलाव येथे मोठ्या प्रमाणात गणेश विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात नागरीक येत असतात. या ठिकाणी करण्‍यात येणा-या कार्याची पाहणी पोलीस आयुक्‍त डॉ.आरती सिंह व मनपा आयुक्‍त डॉ.प्रविण आष्‍टीकर यांनी केली.

    यावेळी पोलीस उपायुक्‍त एम.एम.मकानदार, पोलीस उपायुक्‍त विक्रम साळी, उपायुक्‍त डॉ.सिमा नैताम, उपायुक्‍त भाग्‍यश्री बोरेकर, शहर अभियंता रविन्‍द्र पवार, सहाय्यक पोलीस आयुक्‍त पुनम पाटील, दत्‍ता ढोले, भरत गायकवाड, लक्ष्‍मण डुबरे, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी मनिष ठाकरे, श्री.चोरमाळे, श्री.कुरळकर, गोरखनाथ जाधव, श्री.आठवले, श्री.अढाऊ, सहाय्यक आयुक्‍त नंदकिशोर तिखीले, कार्यकारी अभियंता सुहास चव्‍हाण, अग्निशमन अधिक्षक सय्यद अनवर, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, अतिक्रमण पथक प्रमुख अजय बन्‍सेले, उपअभियंता भास्‍कर तिरपुडे, श्‍यामकांत टोपरे, प्रमोद इंगोले, स्‍वास्‍थ अधिक्षक एकनाथ कुलकर्णी, अभियंता नितीन बोबडे, जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक कुंदन हडाले, स्‍वास्‍थ निरीक्षक पंकज तट्टे, आशिष सहारे, महावितरण विभागाचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, मनपा कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

    मनपा आयुक्‍तांनी आरोग्‍य विभागाला निर्देश दिले की त्‍यांनी गणेशोत्‍सव मार्गांची दैनंदिन साफ सफाई व आरोग्‍य विषयक दैनंदिन फवारणी करावी, विसर्जन ठिकाणी निर्माल्‍याकरीता स्‍वतंत्र व्‍यवस्‍थापन करावे, विसर्जन स्‍थळी मोबाईल टॉयलेटची व्‍यवस्‍था करणे, विसर्जन स्‍थळी प्राथमिक आरोग्‍य पथक अँम्‍बुलंन्‍स सह सज्‍ज ठेवणे तसेच विसर्जन स्‍थळी आवश्‍यक ठिकाणी पाण्‍यावरील गाळ व कचरा काढावा. आर्टीफिशीयल टँक ठेवण्‍याच्‍या सुचना यावेळी देण्‍यात आल्‍या.

    पशुवैद्यकीय विभागामार्फत गणेशोत्‍सव विसर्जनाच्‍या काळात रस्‍त्‍यावरील व विसर्जन परिसरात मोकाट जनावरांची पकडण्‍याची व्‍यवस्‍था करावी. या परिसरात मोकाट जनावर आढळणार नाही यांची दक्षता घेण्‍यात यावी असे मनपा आयुक्‍तांनी यावेळी निर्देश दिले.उद्यान विभागामार्फत विसर्जनाच्‍या मार्गावरील झाडांच्‍या फांद्या छाटण्‍याचे काम पुर्ण करावे तसेच अग्निशमन विभागाने विसर्जन स्‍थळी आपातकालीन पथक तैनात ठेवण्‍याचे निर्देश देण्‍यात आले आहे.

    अतिक्रमण विभागामार्फत विसर्जनस्‍थळी दरवर्षीप्रमाणे व्‍यवस्‍था करण्‍यात येत आहे. तसेच विसर्जनासाठी निर्मित केलेल्‍या खड्डयाचे रुंदीकरण व खोलीकरण करण्‍याचे निर्दे‍श मनपा आयुक्‍तांनी यावेळी दिले. अग्निशमन विभागाला विसर्जन स्‍थळी अग्निशमन पथक सज्‍ज ठेवण्‍याचे निर्देश देण्‍यात आले.मनपा आयुक्‍तांनी विसर्जनाच्‍या स्‍थळी प्रकाश व्‍यवस्‍था, सी.सी.टी.व्‍ही. तसेच जनरेटर लावण्‍याचे निर्देश दिले.

    बांधकाम विभागाला विसर्जनाच्‍या रस्‍त्‍यावरील खड्डे जेट पॅचर अथवा खडी/मुरुमाने भरुण दुरुस्‍ती करण्‍यात आले आहे. तसेच विसर्जनस्‍थळी मंडप, बॅराकेटींग, स्‍टेज व इतर आवश्‍यक व्‍यवस्‍था करण्‍याच्‍या सुचना यावेळी आयुक्‍तांनी दिल्‍या.गणपती मिरवणूक आणि विसर्जन मार्गाची पाहणी केली. यावेळी दस्‍तुरनगर चौक ते फरशीस्‍टॉप या मार्गावर पायदळ पाहणी करुन या मार्गावरील केबल हटविण्‍याच्‍या सुचना यावेळी पोलीस आयुक्‍तांनी दिल्‍या. या रोडवरील मिरवणूकीत अडथळा येणा-या बाबींना त्‍वरीत हटविण्‍याचे निर्देशही यावेळी त्‍यांनी दिले. बाबा कॉर्नर ते विलास नगर या मार्गावरील खड्डे बुजविण्‍याचेही निेर्देश यावेळी देण्‍यात आले. शेगावं नाका ते पंचवटी चौक या रोडची वाहतूक व्‍यवस्‍था सुरळीत होण्‍यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्‍य ते नियोजन करावे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *