Contents hide
- खेळ आता, फार झाले
- जिंदगीला, भार झाले
- थांबवा हा, झोल आता
- काळजावर, वार झाले
- काल ज्यानी, घात केला
- तेच आता, यार झाले
- खावयाला, घास नाही
- गावगावी, बार झाले
- मूक होते, लोकशाही
- कायदे जर, हार झाले
- लुप्त झाली, पाखरे ती
- वृक्ष सारे, ठार झाले
- पोट मागे, भाकरी पण
- पोर खाते, मार झाले
- वाघ काळे, आग होते
- आज का ते, गार झाले
- लागतो हर, घर तिरंगा
- शेठ जगणे, भार झाले
- -अरूण विघ्ने