- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे उद्या, बुधवार, (दि. 31 ऑगस्ट) रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे:
बुधवार, दि. 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4.30 वाजता औरंगाबाद येथून अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्याकडे प्रयाण. रात्री 11 वाजता धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ योजनेंतर्गत दत्तात्रय चुनीलाल पटेल या शेतकऱ्याच्या निवासस्थानी मुक्काम व आगमन.
गुरुवार, दि.1 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” योजनेंतर्गत दत्तात्रय चुनीलाल पटेल( साद्राबाडी ) यांच्या शेतावर त्यांचे समवेत उपस्थित राहून त्यांच्या शेतीविषयक समस्या, अडचणी, प्रश्न समजून घेण्यासाठी उपस्थित राहतील.
त्यानंतर, सायंकाळी 5 वाजता धारणी पंचायत समिती समोर सिव्हिल लाईन येथे 10 हजार शेतकरी उत्पादक केंद्र स्थापन करण्याच्या योजनेचे उद्घाटन करतील. तसेच ताप्तीपुत्र जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनी कार्यालयाचे उद्घाटन करतील. सायंकाळी 7 वाजता धारणी येथून औरंगाबाद जिल्हा, सिल्लोडकडे प्रयाण.