• Mon. Jun 5th, 2023

कशासाठी ?

    सोडुनिया अभिमान
    व्हावे आंधळ्याची काठी
    नाही देहाचा भरोसा
    बोल गर्व कशासाठी ?
    चार हातांची कबर
    नाशिवंत देहासाठी
    गगनचुंबी ईमारत
    तुला हवी कशासाठी ?
    नसे पोटावीन जीव
    राबतोय पोटासाठी
    दोन भाकरीचे पोट
    धन हाव कशासाठी ?
    येथे ठेऊन तिजोऱ्या
    जाशील ऊघड्या मुठी
    भ्रष्टाचार रे लबाडी
    सांग केली कशासाठी ?
    माझं माझं केलं सारं
    नाही राम नाम ओठी
    नाही पुत्र भार्या संगे
    आप्त मोह कशासाठी ?
    नको स्वार्थ अहंकार
    क्षणभंगुर देहासाठी
    पद, सत्ता,लोभ,माया
    कशासाठी, कशासाठी ?
    -वासुदेव महादेवराव खोपडे
    सहा पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त)
    अकोला 9923488556

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *