- अरे आभायातल्या देवा
- तुवा असं कसं केलं
- माह्या कर्माच रे सारं
- कसं पाणी पाणी झालं !!
- बैलापरी बैलासंगे
- राब राबलो रानात
- हाता तोंडाचा रे घास
- कसा गेला रे मातीत !!
- आस कसं रे चुकलं
- पावसाचं रे तंतर
- तुह्या रे आभायातून
- कशी कोसयते धार !!
- धान, बाजरी, जोंधळ
- पिकं गेलं रे वाहून
- बळीराजाच सपान
- तुवा नेलं रे चोरून !!
- कसा वाचू तुह्या म्होरं
- माह्या संकटाचा पाढा
- सांग कसा रे चालवू
- माह्या संसाराचा गाडा !!
- देवा आवर प्रकोप
- थांबो निसर्गाचा ऱ्हास
- चिल्यापिल्याच्या रे मुखी
- पडू देरे चार घास !!
- -वासुदेव महादेवराव खोपडे
- सहा पोलीस उपनिरीक्षक (सेवानिवृत्त)
- अकोला 9923488556