आदिवासी गौरवदिनानिमित्त जारिदा येथे मंगळवारी कार्यक्रम

Thank you for reading this post, don't forget to subscribe!
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त धारणी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातर्फे चिखलदरा तालुक्यातील जारिदा येथे मंगळवारी (9 ऑगस्ट) विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रकल्प अधिकारी सावन कुमार यांनी सांगितले.

    जारिदा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत सकाळी 9 वाजता या कार्यक्रमाला सुरूवात होईल. यानिमित्त गावात रॅली काढण्यात येईल. पारंपरिक आदिवासी नृत्य स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. समाजासाठी विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्ती, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यचळवळीचा इतिहास, गौरवगाथा आदींबाबत व्याख्यानेही यावेळी होतील. या कार्यक्रमाला अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अपर आदिवासी विकास आयुक्त सुरेश वानखडे यांनी केले आहे.