अमरावती शहर अतिक्रमण मुक्‍त, स्‍वच्‍छ, सुंदर व आरोग्‍यदायी करणार खासदार डॉ.अनिल बोंडे

  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : मा.खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आज दिनांक १७ ऑगस्‍ट,२०२२ रोजी महानगरपालिकेच्‍या विविध कामांचा आढावा बैठक महानगरपालिका कॉन्‍फरन्‍स हॉलमध्‍ये दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्‍यात आली होती.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  या बैठकीत खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी सांगितले की, अमरावती शहर अतिक्रमण मुक्‍त, स्‍वच्‍छ, सुंदर व आरोग्‍यदायी आपल्‍याला करायचे आहे त्‍यासाठी आपण प्रतिबध्‍द आहे. या बैठकीत स्‍वच्‍छता, कंटेनर, घनकचरा, बायोमायनिंग, मनपाच्‍या मोकळ्या जागेवर अतिक्रमण असे ब-याच गोष्‍टींवर चर्चा करण्‍यात आली. आपण एक-एक विषय घेत अमरावती शहरात काम करतोय आणि त्‍याशिवाय केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून महानगरपालिका क्षेत्रात १२ स्‍वास्‍थ रुग्‍णालय निर्मित करणासाठी त्‍याचाही पाठपुरावा करण्‍यात येत असल्‍याचे यावेळी त्‍यांनी सांगितले. अशासोबतच शाळा ज्‍या आहे मनपाच्‍या सर्व शाळा या सुंदर झाल्‍या पाहिजे, सोबतच शिक्षण चांगले राहील, शाळा चांगले राहील, दवाखाने चांगल्‍या राहतील, स्‍वच्‍छता राहील, अतिक्रमण मुक्‍त राहील हा प्रयत्‍न असल्‍याचेही यावेळी त्‍यांनी सांगितले. १५ दिवसानंतर बैठक घेण्‍याचा प्रयत्‍न करतोय तसाच प्रतिसाद अधिका-यांचा आहे.

  आपल्‍याकडे साधारणात: पंतप्रधानच्‍या स्‍वनिधीमध्‍ये ३४०० लोकांना १०,००० रुपये स्‍वनिधी देण्‍यात आली आहे. पण अगोदर सर्वेक्षण २०२० मध्‍ये झाले आहे ते ३४०० हॉकर्स नोंदवल्‍या गेले आहे. त्‍यापैकी २२०० लोकांनी कागदपत्रे दिली आहे. हॉकर्स यांना सन्‍मान मिळायला पाहिजे आणि सन्‍मान मिळण्‍यासाठी त्‍यांना ओळखपत्र दिली पाहिजे व गणवेश दिला पाहिजे. त्‍यांच्‍या आज ज्‍या योजना आहे आरोग्‍याच्‍या योजना, विम्‍याच्‍या योजना त्‍या सुध्‍दा त्‍यांना प्राप्‍त झाल्‍या पाहिजे. तसेच पंतप्रधान स्‍वनिधी मिळायला पाहिजे आणि प्रत्‍येक हॉकर्सजवळ ओळखपत्र, फोटो, गणवेश हे जर असल तर शिस्‍त हॉकर्सच्‍या व्‍यवसायात येणार आहे. १५ दिवसानंतर हॉकर्सच मेळावा घेवून त्‍यांना सुचना करण्‍यात येतील, त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात येवून त्‍यांना सगळ्या योजना सांगण्‍यात येतील असे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी यावेळी सांगितले.

  या बैठकीला उपायुक्‍त भाग्‍यश्री बोरेकर, उपायुक्‍त डॉ.सिमा नैताम, सहाय्यक आयुक्‍त नंदकिशोर तिखिले, तौसिफ काझी, वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ. विशाल काळे, सिस्‍टीम मॅनेजर अमित डेंगरे, शिक्षणाधिकारी डॉ.अब्‍दुल राजीक, अतिक्रमण पथक प्रमुख अजय बन्‍सेले, बाजार व परवाना अधिक्षक उदय चव्‍हाण, भाजपा शहर अध्‍यक्ष किरण पातुरकर, प्रा.रविंद्र खांडेकर, माजी महापौर चेतन गावंडे, माजी उपमहापौर कुसुम साहु, संध्‍या टिकले, माजी स्‍थायी समिती सभापती तुषार भारतीय, राधा कुरील, सचिन रासने, माजी पक्षनेता सुनिल काळे, माजी नगरसेवक आशिष अतकरे, मंगेश खोंडे, राजु कुरील, कामेश साहु तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.