• Fri. Jun 9th, 2023

अमरावती महानगरपालिके तर्फे जन्‍म-मृत्‍यु चे ऑनलाईन प्रशिक्षण

  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी तथा जन्‍म-मृत्‍यु निबंधक डॉ.विशाल काळे व अमरावती जिल्‍ह्याचे आरोग्‍य अधिकारी तथा जन्‍म–मृत्‍यु निबंधक डॉ.दिलीप रनमले यांच्‍या मार्गदर्शनात बुधवार दिनांक १७ ऑगस्‍ट,२०२२ रोजी महाराष्‍ट्र शासनाच्‍या निर्देशानुसार अमरावती महानगरपालिके तर्फे जन्‍म-मृत्‍यु चे ऑनलाईन प्रशिक्षण श्री.संत ज्ञानेश्‍वर महाराज सांस्‍कृतिक भवन येथे दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्‍यात आले होते.

  या प्रशिक्षणाला अध्‍यक्ष म्‍हणून सेवा निवृत्‍त सहाय्यक जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. डि.बी. च-हाटे, प्रमुख पाहणे म्‍हणून जिल्‍हा परिषद आरोग्‍य विभागाचे सांख्यिकी अधिकारी रविंद्र देशमुख, प्रशिक्षक म्‍हणून महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी तथा जन्‍म-मृत्‍यु उपनिबंधक डॉ.विक्रांत राजूरकर व पंचायत समिती अमरावतीचे आरोग्‍य विस्‍तार अधिकारी श्री.राम पिंजरकर उपस्थित होते.

  या प्रशिक्षणात जन्‍म-मृत्‍यु दाखले काढण्‍यासाठी नागरिकांना होणारी अडचण पाहता आरोग्‍य विभागाकडुन हे काम आता हॉस्‍पीटल / नर्सिंग होम मधूनच ऑनलाईन पध्‍दतीने होणार असल्‍याची माहिती उपनिबंधक डॉ.विक्रांत राजूरकर व श्री.राम पिंजरकर यांनी दिली. यामुळे वास्‍तविक वेळेनुसार डाटा एंन्‍ट्री (Real Time Data Entry) करणे फार महत्‍वाचे राहणार आहे, जेणेकरुन जन्‍म किंवा मृत्‍यु ची घटना घडल्‍यानंतर नागरिकांना दाखले मिळण्‍यास विलंब होणार नाही.

  या प्रशिक्षणाकरीता अमरावती शहरांतर्गत संयुक्‍ता हॉस्‍पीटल, सोनोने हॉस्‍पीटल, किटुकले हॉस्‍पीटल, हंतोडकर हॉस्‍पीटल, श्री.अंबा मल्‍टीस्‍पेशालिटी हॉस्‍पीटल, मशानकर हॉस्‍पीटल, लाईफ केअर हॉस्‍पीटल, सई मल्‍टी स्‍पेशालिटी हॉस्‍पीटल, इच्‍छामणी हॉस्‍पीटल, हाय-टेक मल्‍टीस्‍पेशालिटी हॉस्‍पीटल, मालपे हॉस्‍पीटल, रेडीयन्‍ट हॉस्‍पीटल, रिम्‍स हॉस्‍पीटल, पीडीएमसी हॉस्‍पीटल, दयासागर हॉस्‍पीटल, पी.आर.पोटे आयुर्वेद कॉलेज व रुग्‍णालय, डॉ.प्रफुल कडू हॉस्‍पीटल, डॉ.हेडगेवार हॉस्‍पीटल, डॉ.नागलकर नर्सिंग होम, अनंत हॉस्‍पीटल, डॉ.बेलोकार हॉस्‍पीटल, इत्‍यादी दवाखान्‍यातील सर्व डॉक्‍टर व त्‍यांच्‍या हॉस्‍पीटलमधील जन्‍म-मृत्‍यु नोंदणी करणारे कर्मचारी उपस्थित होते.

  या प्रशिक्षण यशस्‍वी करण्‍याकरीता वैद्यकीय अधिकारी डॉ.विक्रांत राजूरकर, सांख्यिकी सहाय्यक श्रीमती शालिनी कडू, कनिष्‍ठ लिपिक श्रीमती रजनी उके, संगणक चालक गौरव मरोडकर, कपिल इंगोले, प्रसन्‍नजित चव्‍हाण, वैष्‍णवी जुनघरे, श्रीमती सुनंदा अवघाते इत्‍यादींनी अथक परिश्रम घेतले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *