- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ सलग्नित भारतीय विद्या मंदिर द्वारा संचालित भारतीय महाविद्यालय अमरावती, राष्ट्रीय सेवा योजना द्वारा “हर घर तिरंगा ” या अभियानांतर्गत तिरंगा वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आराधना वैद्य, प्रमुख उपस्थिती डॉ. अलका गायकवाड,डॉ. सतीश कुळकर्णी, डॉ.अनिल खांडेकर, डॉ.नितीन तट्टे, डॉ.मीता कांबळे, दीपलक्ष्मी कुळकर्णी, डॉ.संगीता कुळकर्णी, डॉ.अमरीश काळीकर ,डॉ.दया पांडे, डॉ.संगीता देशमुख,डॉ. विनोद कल्याणवार,प्रा. निलेश कडू, प्रा.लाभेश साबळे, डॉ.आम्रपाली वासनिक, डॉ.मीना डोईबोले, प्रा. ऋषभ डहाके,डॉ. वैशाली बिजवे,डॉ.मीना दवांडे, प्रा.विशाल वरघट,डॉ.प्रशांत विघे, कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना, डॉ.सुमेध वरघट, सह-कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना, डॉ.स्नेहा जोशी, महिला कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. पल्लवी सिंग,महिला कार्यक्रम अधिकारी राष्ट्रीय सेवा योजना उपस्थित होत्या.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या वतीने शासनाच्या आदेशाला अनुसरून 200 तिरंगा झेंडा विद्यार्थी आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना प्राचार्य डॉ.आराधना वैद्य यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.