Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

फवारणी व धुवारणी यंत्राद्वारे शहरातील सर्व प्रभागामध्‍ये धुवारणी व फवारणी

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती शहरात मागील काही दिवसांत मच्‍छरांचा प्रादुर्भाव वाढला असून अमरावती शहरामधील २२ प्रभागामध्‍ये तातडीने घरोघरी, प्रभागातील परिसरात धुवारणी व फवारणी करावी असे निर्देश सर्व जेष्‍ठ स्‍वास्‍थ निरीक्षक, स्‍वास्‍थ निरीक्षक व स्‍वच्‍छता कंत्राटदारांना देण्‍यात आले होते. याच दरम्‍यान शहरात मच्‍छरांचाही प्रादुर्भाव वाढत असून यामुळे डेंग्‍यु, मलेरिया आणि इतर साथ रोगांची शक्‍यता तीव्र प्रमाणात वाढू नये या अनुषंगाने स्‍वच्‍छता विभाग प्रतिबंधात्‍मक उपाययोजना करण्‍याच्‍या दृष्‍टीकोनातून कामाला लागलेला आहे. स्‍वच्‍छता कंत्राटदारांच्‍या करारनाम्‍यातील नमूद अटी व शर्तीनुसार स्‍वच्‍छता कंत्राटदारांच्‍या फवारणी व धुवारणी यंत्राद्वारे शहरातील सर्व प्रभागामध्‍ये धुवारणी व फवारणी करण्‍याकरीता दिनांक २१ जुलै,२०२२ रोजी मोहीम राबविण्‍यात येत आहे. याबाबत शहरामधील कोणत्‍याही नागरिकांची तक्रार प्राप्‍त झाल्‍यास सदर बाबतीत तात्‍काळ तक्रारींचे निवारण करण्‍याचे काम सुरु करण्‍यात आले.

    प्रभाग क्र.१८ राजापेठ अंतर्गत येणाऱ्या बालाजी नगर, अंबिका नगर येथे फवारणी व धन्वंतरी नगर, विमल नगर, फरशी स्टॉप परिसर मध्ये धुवारणी करण्यात आली.प्रभाग क्रमांक २० सूतगिरणी अंतर्गत येणाऱ्या परिसरात स्प्रे फवारणी व धुवारणी करण्यात आली तसेच परिसरात जागोजागी पडलेला केरकचरा उचलण्यात आला. रोड डीव्हायडर, फुटपाथ, कंटेनर परिसराची व नाल्याची साफ सफाई करण्यात आली व डेंग्यु आजाराबाबत जनजागृती करण्यात आली.

    प्रभाग क्र.२१ जुनीवस्ती वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) तथा उपायुक्त (सा.) डॉ.सिमा नैताम व सहाय्यक आयुक्त भाग्‍यश्री बोरेकर दक्षिण झोन क्र.४ बडनेरा यांच्याद्वारे प्राप्त निर्देशानुसार पावसाळ्याचा कालावधी सवारी मैदान, नूर नगर, मर्कस मजीद परिसरातील नागरिकांच्या घरातील वापरण्यात येणाऱ्या कुलर, फुलदाणी, इतरत्र तपासणी करून डेंग्‍यु जनजागृती, हस्तपत्रके वाटप करण्‍यात आले. कंटेनरमध्ये एम.एल.ओ. टाकण्यात आले तसेच प्रभागातील इस्लामी चौक, मर्कस मजीद परिसर, नूर नगर परिसरात धुवारणी व अलमास नगर परिसरात फवारणी करण्‍यात आली. तसेच प्रभागातील गोपाळ नगर टी पाइंट परिसरात अंडर ग्राउंड चेंबर चोकप झाल्याने जेट मशीनद्वारे सदर अंडर ग्राऊंड चेंबर ची साफ सफाई करून घेण्यात आले.

    वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) तथा उपायुक्‍त (सा.) डॉ.सिमा नैताम व सहाय्यक आयुक्त झोन क्र.३ यांच्या निर्देशानुसार पुर्व झोन क्र.३ दस्तुरनगर प्रभाग क्र.१०/१ बेनोड़ा-दस्तुरनगर मध्ये दि.२१/०७/२०२२ रोजी सकाळी साफ़ सफाई कंत्राटदार मार्फत चैतन्य कॉलनी, जीवन ज्योति कॉलनी येथे सायंकाळी धुवारणी व सकाळी जीवन ज्योति कॉलनी, जेवडनगर येथे स्प्रे-फवारणी करण्यात आली तसेच डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code