Header Ads Widget

श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावतीच्या पदवी प्रमाणपत्र वितरण व विद्यार्थी गुण गौरव सोहळ्याचे आयोजन

    * श्री हर्षवर्धनजी देशमुख यांच्या अध्यक्षतेत पार पडणार सोहळा
    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती येथे चवथ्या पदवी प्रमाणपत्र वितरण व विद्यार्थी गुण गौरव सोहळ्याचे आयोजन दिनांक १९ जुलै २०२२ रोजी सकाळी १०.३० वा. सर सी. व्ही. रमण सभागृहात करण्यात आले आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीच्या गुणवत्ता यादीत झळकलेल्या पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमातील गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना या प्रसंगी प्रमाणपत्र व सुवर्ण पदक देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयातील विविध विषय विभागांच्या प्राध्यापकांनी प्रायोजित केलेल्या सुवर्ण पदकांचे वितरण करण्यात येणार आहे.

    या सोहळ्याला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. विजयकुमार चौबे प्रमुख अतिथी लाभले असून विशेष अतिथी म्हणून महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उच्च शिक्षण संचालक डॉ. व्ही. जी. ठाकरे उपस्थित राहणार आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री. हर्षवर्धनजी देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भुषविणार आहेत.

    या सोहळ्याला गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत करण्याकरीता उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी व्ही कोरपे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या