अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती महानगरपालिकेतील दिनांक ३० जुन,२०२२ रोजी वरिष्ठ लिपिक विनोद निचत हे आज सेवानिवृत्त झाल्यामुळे त्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन सामान्य प्रशासन विभागात आयोजित करण्यात आले होते.
यावेळी वरिष्ठ लिपिक विनोद निचत यांचा पुष्पगुच्छ देऊन व भेट वस्तु देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यालय अधिक्षक संजय दारव्हेकर, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, प्रदिप देशपांडे, अशोक पंचभाई, वरिष्ठ लेखापरिक्षक धनंजय पाठक, सौ.ज्योती पारडशिंगे, प्रमोद मोहोड, दिवाकर लकडे, श्री.अशपाक सिध्दीकी, अनिल खडसे, सौ.कांचन राऊत, श्री.शरद काळे, राहुल खरे, कपिल सारसर, अश्विनी लोंदे, अर्चना इंगळे, कल्पना मावदे, रिध्दी कान्हेरकर, सिध्दांत पडोळे, वर्षा वाटाणे, स्नेहा निचत, सुरज निमकर, चंद्रकांत लोखंडे, व इतर कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.
विनोद निचत यांनी आपली सेवा सामान्य प्रशासन विभागात दिली असून सामान्य प्रशासन विभागातील त्यांच्या सर्व सहकार्यांकडून त्यांना यावेळी भेट वस्तु देवून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आज त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा पेढे भरवून वाढदिवस साजरा करण्यात आला.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या