Header Ads Widget

महात्मा फुले यांच्या साहित्यावर राज्यस्तरीय चर्चासत्र संपन्न

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : महात्मा फुले महाविद्यालय अमरावती आणि श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किरण नगर अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिराव फुले यांचे साहित्य चिंतन व चर्चा या विषयावर दूरदृष्टी प्रणाली द्वारे एक दिवशीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले सदर चर्चासत्राचे उद्घाटक श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश चंदनपाट हे होते तर चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ मीनल ठाकरे यांची उपस्थिती होती प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ .काशिनाथ ब-हाटे स्व. सी एम कढी महाविद्यालय परतवाडा आणि डॉ. शैलेंद्र लेंडे प्राध्यापक मराठी विभाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांनी मार्गदर्शनाची बहुमोल भूमिका पार पाडली.

    कार्यशाळेची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे प्रतिमापूजन व मल्हार पण करून करण्यात आली कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. दीपक वानखडे मराठी विभाग प्रमुख महात्मा फुले महाविद्यालय अमरावती यांनी केले प्रास्ताविकांमधून त्यांनी आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली .उद्घाटन पर भाषणांमधून प्राचार्य डॉ.राजेश चंदनपाट यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्याचा आढावा घेतला व त्यांचे कार्य हे मौलिक स्वरूपाचे होते त्यांच्या विचाराची आजही नितांत गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले व वर्तमान परिस्थितीमध्ये अशा चर्चासत्राची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले .मराठीतील समीक्षक संशोधक प्राचार्य डॉ.काशिनाथ बऱ्हाटे यांनी पहिल्या सत्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या ललित साहित्यातील मूल्य दर्शन या विषयावर मार्गदर्शन केले.

    यावेळी त्यांनी महात्मा फुले यांच्या ललित साहित्याचा विस्तृत आढावा घेतला व महात्मा फुले यांचे साहित्य मूल्याधारीत असून मनोरंजन करणे हा त्यांच्या साहित्याचा उद्देश नव्हता तर मूल्य दृष्टीत समाजाची निर्मिती करणे या दृष्टीने त्यांचे साहित्य महत्त्वपूर्ण होते आजच्या काळालाही त्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

    चर्चासत्राच्या दुसऱ्या सत्रामध्ये मराठी भाषेचे अभ्यासक संशोधक समीक्षक प्राध्यापक डॉ . शैलेंद्र लेंडे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वैचारिक साहित्यातील विचारांची वर्तमानकालीन उपयोगिता या विषयावर आपले मत व्यक्त केले .महात्मा फुले यांचे वैचारिक साहित्य हा अनमोल ठेवा असून त्यांनी यावेळी महात्मा फुलेंच्या वैचारिक साहित्याचा चिकित्सक पद्धतीने आढावा घेतला महात्मा ज्योतिराव फुले यांचे वैचारिक साहित्य हे समाजाची त्यांनी पीडित वंचित शेतकरी शेतमजूर यांचे प्रश्न सोडविण्यास सहाय्यभूत ठरणारे आहे त्यांचे साहित्य हे मानवतावादी साहित्य आहे व ते कालातित आहे .सद्यस्थितीमध्ये आपल्या देशाला महात्मा फुले यांच्या विचाराची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

    कार्यशाळेच्या अध्यक्षा प्राचार्य डॉ.मीनल ठाकरे (भोंडे)यांनी महात्मा फुले हे आद्य समाज सुधारक असून त्यांचे विचार व साहित्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्यावर चर्चासत्राचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदनही त्यांनी यावेळी केले.

    या संपूर्ण कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ.पंकज वानखेडे मराठी विभागप्रमुख श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अमरावती यांनी केले तर चर्चासत्राला लाभलेले मार्गदर्शक वक्ते त्यांचा विस्तृत परिचय आणि आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ.अण्णा वैद्य मराठी विभाग श्रीमती नरसम्मा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय अमरावती यांनी केले कार्यक्रमाची तांत्रिक बाजू प्रा.भूषण पाडर विभाग प्रमुख बीसीए महात्मा फुले महाविद्यालय अमरावती यांनी सांभाळली कार्यक्रमाच्या आयोजनासाठी दोन्ही महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले कार्यशाळेला बहुसंख्येने प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी ऑनलाइन उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या