Header Ads Widget

मेळघाटात खेडोपाडी आवश्यक कामांसाठी गावनिहाय समिती -जि. प. सीईओ अविश्यांत पंडा

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : दूषित पाणी बाधा प्रकरणाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मेळघाटातील गावांमध्ये आवश्यक विविध कामांच्या सातत्यपूर्ण संनियंत्रणासाठी समिती गठित करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज जारी केला.

    चिखलदरा तालुक्यात दूषित पाणी पिल्याने नागरिकांना लागण होण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामपंचायत स्तरावरील विविध कामे वेळेत व अचूकपणे पार पडण्यासाठी समितीने दक्ष राहून कार्यवाही करावी, असे निर्देश श्री. पंडा यांनी धारणी व चिखलदरा येथील गटविकास अधिका-यांना दिले आहेत.

    ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, आशा, जलसुरक्षक, रोजगार सेवक, पाणी पुरवठा कर्मचारी यांचा समितीत समावेश असेल. समिती महिन्यात दर सोमवारी गावातील आवश्यक कामे, स्थिती, खर्च, आवश्यक निधी याचा सविस्तर आढावा घेईल. आठवड्याचे अहवाल दर बुधवारी विस्तार अधिकारी (पंचायत) यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिका-यांना प्राप्त होतील. समितीमधील सदस्यांना शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य आहे.

    महिन्यातील पहिल्या सोमवारी समिती आरोग्य, साथरोग सनियंत्रण, पाणी पुरवठा, कुपोषण आढावा, शिक्षण आढावा, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आढावा, पेसाबाबत आढावा, जलसंवर्धन आदींचा, दुस-या सोमवारी बांधकाम आढावा, करवसुली आढावा, 15 वा वित्त आयोग खर्चाबाबत आढावा, कृषी आढावा, पशुसंवर्धन आढावा, पथ दिवे, विद्युत देयके भरणाबाबत आढावा, तिस-या सोमवारी आरोग्य, साथरोग सनियंत्रण, पाणी पुरवठा, कुपोषण आढावा, शिक्षण आढावा, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना आढावा, पेसाबाबत आढावा, जलसंवर्धन आदींचा आढावा घेईल.महिन्यातील चौथ्या सोमवारी बांधकाम आढावा, करवसुली आढावा, 15 वा वित्त आयोग खर्चाबाबत आढावा, कृषीबाबत आढावा, पशुसंवर्धनबाबत आढावा, पथ दिवे, विद्युत देयके भरणाबाबत आढावा घेतला जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या