अमरावती (प्रतिनिधी) : जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी पुरवणी परीक्षेस प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमित व विलंब शुल्कासह परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन स्विकारण्याची मुदत दि. 4 जुलै 2022 रोजी संपुष्टात आली आहे.
आवेदनपत्र सादर करण्याची निर्धारीत मुदत संपल्यानंतर श्रेणी/तोंडी/प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होण्यापूर्वी 30 दिवसांचा कालावधी वगळून त्याआगोदर प्रतिदिनी पन्नास रुपये याप्रमाणे अतिविलंब शुल्क दि. 5 जुलै ते 14 जुलै पर्यंत भरावे. अतिविलंब शुल्काच्या निर्धारित तारखेनंतर लेखी किंवा प्रात्यक्षिक परीक्षेच्या आगोदर जी परीक्षा सुरु होणार आहे. त्यातील सुरुवातीच्या 15 दिवसापर्यंत प्रती विद्यार्थी प्रती दिन शंभर रुपये दि. 15 जुलै ते 20 जुलै आणि विषेश अतिविलंब शुल्क व तद्नंतरच्या 15 दिवसापर्यंत दोनशे रुपये प्रमाणे अतिविशेष अतिविलंब शुल्क आकारुन आवेदनपत्र स्विकारण्याच्या 2022 अतिविलंब शुल्क भरण्याची अंतिम मुदत दि. 21 जुलै ते 25 जुलै आहे. माध्यमिक शाळांनी आवेदनपत्र ऑनलाईन पध्दतीने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर सादर करण्याबाबत राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या