Header Ads Widget

अतिवृष्टीमुळे चांदूर बाजार तालुक्यात घरांचे नुकसान ; तात्काळ पंचनामे करण्याबाबत पथकाला सुचना

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : दिनांक 5 रोजी चांदुर बाजार तालुक्यात अतिवृष्टी झाली. तालुक्यातील टिपू सुलतान चौक, रामभट लेआऊट, राऊत पूरा, ताजनगर या परिसरामध्ये अंदाजे 390 घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. पावसाचे पाणी जास्त प्रमाणात घराता शिरल्यामुळे काही घरांचे अंशता: व काही घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे.

    घरामध्ये पाणी साचल्यामुळे अन्नधान्याचे,कपड्यांचे व इतर वस्तुंचे काही प्रमाणात नुकसान झाले. या परिसरातील बाधीत कुंटुंबाना नगर परिषद उर्दु शाळा व नगर परिषदेच्या टाऊन हॉलमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. बाधीत नागरीकांची जेवण्याची व तात्पुरती निवासाची व्यवस्था प्रशासनाकडुन करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन तात्काळ पंचनामे करण्याबाबत पथक नेमण्यात आले आहे. पंचनाम्याची प्रक्रिया गतीने पार पाडण्यात यावी अशा सुचना प्रशासनाकडुन देण्यात आल्या आहेत. पंचनामे प्राप्त होताच अंतिम अहवाल सादर करण्यात येईल अशी माहिती चांदूर बाजारचे तहसिलदार यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या