अमरावती (प्रतिनिधी) : दि:-०१/०७/२०२२ वार शुक्रवार रोजी दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी व दत्त प्राथमिक विद्यामंदिर बार्शी या दोन्ही शाळेत प्रगती फौंडेशन च्या सहकार्याने विध्यार्थी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी छत्रपती क्रीडा, शिक्षण व समाजसेवी संस्था,उपळाई(ठोंगे) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.मोहन (आण्णा) ठोंगे तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.श्री.संदीप पाटील बालरोगतज्ञ (आयुष बालरोग क्लिनिक बार्शी) डॉ.स्मिता कदम (कदम हॉस्पिटल बार्शी),श्री.जी.एम.दिवटे (सचिव- प्रगती फौंडेशन), सौ.पदमजा दिवटे (संचालिका- प्रगती फौंडेशन) उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून दिलीप राव सोपल प्रशालेचे मुख्या.श्री. चंद्रकांत लोखंडे सर, श्री.निखिल मस्के(महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक युवक काँग्रेस उपाध्यक्ष) उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमपूजनाने आरोग्य तपासणी शिबिरास सुरुवात करण्यात आली इयत्ता १ली ते इयत्ता १० वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून ज्या विद्यार्थ्यास औषधोपचाराची आवश्यकता आहे अशा विद्यार्थ्यांच्या पालकास बोलावून त्यांच्या पाल्यास योग्य औषधोपचाराची गरज असल्याचे डॉक्टरांनी समजावून सांगितले.
सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री.युवराज जगताप सर, श्री.सुनील लंगोटे,श्री.मंगेश मोरे,श्री. श्रीकांत कुंभारे,श्री.सचिन काळे , श्रीम.संगीता काळे ,अरुणा मठपती,सौ. शितल पाटील,श्री. राहूल ठोंगे ,श्री.संतोष ठोंबरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. श्रीकांत कुंभारे सर यांनी केले उत्साही वातावरणात आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या