Header Ads Widget

गौरव प्रकाशनची गौरवशाली वाटचाल- गणेशराव सरोदे संचालक महा बँक

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : गौरव प्रकाशन अमरावती उत्तम नगर येथील नवीन कार्यालयाचे उद्घाटन सोहळा भदंन्त धम्मतीस्स यांचे अध्यक्षतेखाली व श्री. गणेशराव गुलाबराव सरोदे संचालक महाबँक नाशिक यांचे हस्ते रविवार दि. 10 जुलै 2022 रोजी दिप प्रज्वलन करून नुकताच पार पडला.

    गौरव प्रकाशनची गौरवशाली यशस्वी वाटचाल असे गौरवोद्गार उद्घाटनप्रसंगी गणेशराव गुलाबराव सरोदे संचालक महाबँक नाशिक यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला प्रामुख्याने रामभाऊ कावडकर, गुलाबराव सरोदे, भिमरावजी तसरे,अशोकराव गोंडाणे, पुरुषोत्तम काकडे, कमलेश अलोणे, प्रवीण माथुरकर, संघपाल पिलावन, प्रफुल्ल गुडदे, अजय मुन, नीलेश जवंजाळ, राजुभाऊ मोहोड, नीलेश कावडकर, सतीश गवई, अनिकेत काळबांडे, सुमीत भटकर, सुरज मोहोड, स्वप्नील मोहोड, श्रीमती काळबांडे, सौ. अर्चना धवणे, दिपाली बोरकर, कांताबाई गवई, शीलाताई भटकर, अनुश्री धवणे, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक गौरव प्रकाशनचे मुख्य संपादक बंडूकुमार धवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन गौरव प्रकाशनचे कार्यकारी संपादक गौरव धवणे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या