Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

सकाळी दूध पिणे मधुमेहींसाठी उपकारक

    न्याहारीच्या वेळेस दूध प्यायल्याने मधुमेहींमधील रक्त शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होत असल्याचे एका अभ्यासात आढळले आहे. कॅनडामधील टोरंटो विद्यापीठ आणि गिलेफ विद्यापीठातील संशोधकांना न्याहारीत बदल केल्यास मधुमेहींना अनेक फायदे होत असल्याचे आढळले. न्याहारी करताना दूध प्यायल्याने जेवणानंतर रक्तात होणार्‍या शर्करेतील वाढ कमी होते. त्याचप्रमाणे दिवसभर भूक कमी लागते असे आढळले.

    जगभरात चयापचयासंबंधित विकाराचे प्रमाण वाढत आहे. लठ्ठपणा आणि मधुमेह या आरोग्याच्या मुख्य समस्या आहेत, असे गिलेफ विद्यापीठातील डगलस गोफ यांनी म्हटले. त्यामुळे वैयक्तिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि मधुमेह, लठ्ठपणा या समस्येवर उपाय म्हणून आहारविषयक धोरण तयार करणे आवश्यक आहे, असे गोफ यांनी सांगितले. संशोधकांनी न्याहारीसोबत प्रथिनांचे प्रमाण वाढविल्यानंतर होणार्‍या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी दुधातील व्हे प्रथिनांचे प्रमाण वाढवले. याचा रक्तातील शर्करेवर आणि दिवसभरातील आहारावर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला. नैसर्गिकरीत्या दुधामध्ये असणारी प्रथिने आतड्यांतील जनुंकामध्ये सोडली जातात. ज्यामुळे चयापचयाची प्रक्रियेचा वेग मंदावतो आणि पोट भरल्यासारखे वाटते. व्हे प्रथिनांमुळे हे परिणाम लवकर दिसून येत असून कॅसिझन प्रथिनांमुळे हे परिणाम जास्त काळ टिकतात. संशोधकांना व्हे प्रथिनांचे सेवन केल्यानंतर दुपारच्या जेवणात मोठय़ा प्रमाणात बदल झाल्याचे आढळून आले नाही. पण काबरेहायड्रेट अधिक असणार्‍या आहारासह सकाळी दूध प्यायल्याने दुपारच्या जेवणानंतरही रक्तातील शर्करेच्या पातळीत घट दिसून आले. प्रथिने जास्त असलेल्या दुधामुळे याहून अधिक चांगले परिणाम आढळून आल्याचे संशोधकांनी म्हटले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code