- * भविष्यवेधी सिंहावलोकन शिक्षण मंचचा यवतमाळ जिल्हा प्राध्यापक मेळावा संपन्न
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ शिक्षण मंचच्या यवतमाळ जिल्हा कार्यकारीणीद्वारा आयोजित जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांचा मेळावा लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात यशस्वी संपन्न झाला.
एकुण १४५ प्राध्यापकांची उपस्थिती असलेल्या या मेळव्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षण मंच तथा अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष प्रा. प्रदीप खेडकर होते. तसेच विशुद्ध शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. विनायकजी दाते यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले. आपल्या उद्घाटनपर भाषणात संस्थाचालक, प्राचार्य व प्राध्यापक यांच्यामध्ये शिक्षण मंचने साधलेल्या समन्वयाबाबत समाधान व्यक्त करतांना प्रा. प्रदिप खेडकरांसारख्या कुशल नेतृत्वाची शिक्षण क्षेत्राला आज गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. प्रमुख पाहुणे शिवशक्ती महाविद्यालयाचे व्यवस्थापक श्री. बाळासाहेब धांडे यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालये, शिक्षक व विद्यार्थी यांच्या अडचणी सोडवतांना शिक्षण मंचने केलेल्या सहकार्याचा विशेष उल्लेख करत मंचला पुढिल यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
आपल्या अध्यक्षीय संबोधनातून प्रा. प्रदीप खेडकर यांनी सांगितले की, व्यक्तिगत प्राध्यापकापासून तर विशिष्ट समूहातील प्राध्यापकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षण मंचने विद्यापीठ, सहसंचालक, राज्य तथा केंद्र शासन, यूजीसी, इत्यादी स्तरावर भक्कम पाठपुरावा करून अनेक समस्यांचे समाधान शोधण्याचा प्रयत्न केला आहे. शिक्षण मंचने सनदशीर मार्गाने समन्वय साधून केलेल्या चर्चा-पत्रव्यवहारातून कुठल्याही प्रकारचे आंदोलन न करता अनेक समस्यांचे निराकरण केले व सर्व घटकांशी समन्वय, सहचर्चा आणि संवाद साधत कसे काम केले याचे खर्या अर्थाने सिंहावलोकन झालेच पाहिजे हेच अशा प्रकारच्या मेळाव्याचे उदिष्ट असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी यवतमाळ जिल्हा संपर्क प्रमुख प्राचार्य डॉ. मीनल भोंडे व जिल्हा प्रभारी प्रा. डॉ. अजय लाड यांनी मंचची यवतमाळ जिल्ह्यातील कामे व वाटचालीचा लेखाजोखा मांडला.
प्रा प्रदीप खेडकर यांना सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संवर्ग अध्यक्ष म्हणून नेतृत्व संधी शैक्षिक महासंघाने प्रदान केल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. उद्घाटन सत्राची सुरुवात भारत मातेच्या प्रतिमाला अभिवादन करुन प्राचार्य डॉ. मिनलताई भोंडे यांनी गायलेल्या संघटन गीताने झाली. यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रा. राधेश्याम चौधरी यांनी प्रास्ताविक सादर केले तर उदघाटन सत्राचे सूत्र संचालन प्रा. संतोष गाजले यांनी केले.
दुपारच्या विविध सत्रामधून प्राचार्य डॉ. नंदकिशोर ठाकरे, डॉ. रेखा मग्गीरवार, डॉ. प्रफुल्ल गवई, डॉ. दिनेश सातंगे यांच्यासह सत्राध्यक्ष प्राचार्य डॉ. नंदकिशोर ठाकरे व सत्राध्यक्ष डॉ. सुनील आखरे यांनी मंचची यशोगाथा मांडतांना शिक्षण मंचच्या माध्यमातून हाताळण्यात आलेल्या अनेक विषयावर प्रकाश टाकला. विद्यापीठाची विविध प्राधिकरणे, अभ्यासमंडळ, विद्याशाखा, व्यवस्थापन परिषद सदस्यांनी संघटनेच्या मुलभूत विचारांमधून केलेल्या कार्याचा सर्वंकष आढावा घेतला. प्राचार्य कार्यकारणी महामंत्री डॉ. राजेंद्र क्षीरसागर, यवतमाळ महिला कार्यकारिणी अध्यक्ष डॉ. सुनीता गुप्ता, महामंत्री डॉ. वीरा मांडवकर, महामंत्री प्रा. डॉ. चंद्रशेखर कासार, प्राचार्य डॉ. पवन मांडवकर, प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे यांच्या विशेष उपस्थीतीमध्ये झालेल्या मेळाव्याच्या समारोप सत्राची सांगता प्रा. डॉ. पुर्णिमा दिवसे यांच्या सुमधूर शांती मंत्राने झाली.
0 टिप्पण्या