मुंबई : झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांना भाजपच्या वतीने राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचा हा निर्णय अतिशय योग्य असून द्रौपदी मुर्मू या देशातील सर्वोच्च पदासह सर्वसामान्यांना न्याय देतील,असा विश्वास इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केला. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुर्मू या सहज विजयी होतील.अनेक विरोधी पक्षांनी मुर्मू यांना समर्थन जाहीर केले आहे.अशात देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती मुर्मू यांच्या रूपाने मिळण्याची शक्यता बळावली आहे. तर, त्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती होतील.यूपीएच्या काळात काँग्रेसने प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदावर संधी दिली होती.
तळागाळातील हलाखीच्या परिस्थितीतून वर आलेल्या मुर्मू या पदासाठी अत्यंत योग्य उमेदवार आहेत. समाजसेवक आणि प्रसिद्धी पासून दूर असलेल्या मुर्मू देशातील आदिवासी, दलित, इतर मागासवर्गीयांसह सर्वांना न्याय देतील. त्यांना उमेदवारी देवून भाजपने आदिवासी समाजाला न्याय दिला आहे,असे मत देखील पाटील यांनी व्यक्त केले.
मुर्मू या ओडिशा जिल्ह्यातील मयुरभंज जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्त्व करतात.सरकारी कार्यालयात त्या लेखनिक मधून कार्यरत होत्या.मुर्मू यांनी मोफत अध्यापनाचे काम केले त्यानंतर त्या राजकारणात आल्या. भाजपच्या आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू २००० आणि २००९ मध्ये विजयी झाल्या.भाजपमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.भाजपच्या आदिवासी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांनी २०१३ त २०१५ मध्ये काम केले आहे, हे विशेष. उपराष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्रातील माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांचे नाव चर्चेत आहेत.त्यांना उमेदवारी मिळाली तर ते देखील या पदाला योग्य न्याय देवू शकतील, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या