Header Ads Widget

तरूण माध्यमकर्मींसाठी ‘आयआयएमसी’तर्फे नागपुरात सोमवारी चर्चासत्र

    गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती, दि. 16 : येथील भारतीय जनसंचार संस्थानच्या वतीने (आयआयएमसी) युनिसेफच्या सहकार्याने 'तरुण माध्यम व्यावसायिकांचे मानसिक आरोग्य' या विषयावरील चर्चासत्र नागपुरात बजाजनगरातील आयसीएआर-एनबीएसएस सभागृहात सोमवारी (18 जुलै) सकाळी 10.30 वा. होणार आहे.

    आयआयएमसीचे महासंचालक डॉ. संजय द्विवेदी अध्यक्षस्थानी असतील. चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे प्रा. कृपाशंकर चौबे, वरिष्ठ पत्रकार व नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, आयआयएमसीचे विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता डॉ. प्रमोद कुमार, आयसीएआर-एनबीएसएसचे सहायक संचालक डॉ. बी. एस. द्विवेदी, मानसोपचार सोसायटीचे अध्यक्ष डॉ. सागर चिद्दरवार, ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे, कार्तिक लोखंडे, शैलेश पांडे, केंद्रिय माहिती ब्युरोचे शशिन राय, युनिसेफच्या संवाद तज्ज्ञ स्वाती महापात्रा मार्गदर्शन करणार आहेत.

    तरूण माध्यम व्यावसायिकांना उद्योगात येणाऱ्या मानसिक ताणतणाव व उपाययोजना याबाबत या कार्यक्रमात मार्गदर्शन केले जाईल. सर्व सहभागींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. विदर्भातील माध्यमांचे विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक, व्यावसायिक यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयआयएमसीचे प्रादेशिक संचालक डॉ. व्ही.के. भारती यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या