Header Ads Widget

"सिनेमा सिनेमा खेळताना " - चित्रपट उद्योजकता कार्यशाळा संपन्न

  * फ़िल्म रील्स प्रॉडक्शन, बीइंग आर्टिस्ट अकेडमी ऑफ फ़िल्म अँड थिएटर आर्ट्स चा संयुक्त उपक्रम
  गौरव प्रकाशन वृत्तसंकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : सिनेमा-वेब सिरीज-टीवी सिरियल्स यांसारख्या माध्यामांमधे व्यवसायाच्या, रोजगाराच्या, नोकरीच्या संधी साठी धडपड करणाऱ्या नवोदित कलावंत तसेच विद्यार्थी यांना चित्रपट उद्योग क्षेत्राची नीट ओळख, त्यातील व्यवसायाच्या, रोजगाराच्या,नोकरीच्या विविध संधी तसेच चित्रपट निर्मितीचे पायाभूत प्रशिक्षण देणाऱ्या " सिनेमा सिनेमा खेळताना " चित्रपट उद्योजकता व चित्रपट निर्मिती प्रशिक्षण कार्यशाळा चे आयोजन फ़िल्म रील्स प्रॉडक्शन, बीइंग आर्टिस्ट अकेडमी ऑफ फ़िल्म अँड थिएटर आर्ट्स व अमरावती युवा स्पंदन सिनेमा प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने, 17 जुलै 2022 रोजी कांडली परिसर, परतवाडा येथे करण्यात आले होते.

  आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान प्रगतीमुळे व मोबाईल कँमेरा, स्वस्त प्रगत डिजिटल कँमेरा ,कंप्युटर, इंटरनेट या साधनांची सहज उपलब्धता तसेच यु-ट्यूब, फेसबूक, टीक टीक, रील्स तसेच विभिन्न ओ टी टी चेनेल्सअश्या बऱ्याच सोशल मीडिया प्लेट्फोर्म्स ची अगदी चुटकीसरशी उपलब्धता या सर्वाँमुळे अनेक अनुभवी व नवोदित कलावंत आपली कला जगासमोर आणण्याचा, गुणवत्तेचा विचार न करता फक्त त्यातून प्रसिद्धी आणि अर्थार्जनाचा प्रयत्न करताना सर्रास बघायला मिळतात . पण काही मोजकेच लोक सोडलेत तर बऱ्याच लोकाना हव तसं यश संपादन करने जमत नाही .कारण फक्त आंधळे पणाने वा अति आत्म विश्वासाने दिखाऊ पणाला भूलून त्या क्षेत्राचा अजिबात न केलेला अभ्यास किंवा त्यातील व्यवसायाच्या, रोजगाराच्या, शासकीय-अशासकीय नोकरीच्या संधीची अर्धवट माहिती किंवा पूर्ण अज्ञान. याच सर्व बाबी लक्षात घेउन अमरावती युवा स्पंदन सिनेमा प्रॉडक्शन, बीइंग आर्टिस्ट अकेडमी ऑफ फ़िल्म अँड थिएटर आर्ट्स या संस्था अमरावती विभागातच नव्हे तर विदर्भात शक्य होईल तालुका-ग्रामीण विभागात " सिनेमा सिनेमा खेळताना " या चित्रपट उद्योजकता जागरूकता कार्यक्रम व चित्रपट निर्मिती कार्यशाळा च्या माध्यामातून सातत्याने कार्यरत आहेत . त्याच अनुषंगाने कांडली, परतवाडा येथील फ़िल्म रील्स प्रॉडक्शन चे संचालक कलावंत रूपेश सराट्कर यांनी अश्याच कार्यशालेचे आयोजन केले होते.

  या कार्यशाळेत उपस्थित विद्यार्थ्यांना-कलावंतांना अमरावती युवा स्पंदन सिनेमा प्रॉडक्शन चे निर्माता-लेखक-दिग्दर्शक व अभिनेता पंकज धन्दर यांनी चित्रपट निर्मितीच्या पायाभूत प्रक्रीयेची रीतसर माहिती दिली. सिनेमा किंवा चित्रपट म्हणजे नेमके काय ? कला-व्यवसाय-उद्योग-करियर म्हणून या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असावा ? निर्माता, कथा लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, प्रकाश योजना, संकलन, ध्वनी, कला दिग्दर्शन, रंगभूषा, वेशभूषा, जाहिरात व प्रसिद्धी, सेन्सॉर सर्टीफिकेशन, वितरण व्यवस्था या सर्व विभागांचे कार्य व कार्य पद्धती यावर चर्चात्मक मार्ग दर्शन केले आणि आर्थिक गुंतवणुक व मोबदला या विषयांची विशेष माहिती उपस्थितांना दिली . या सर्व बाबींचे रीतसर शिक्षण प्रशिक्षण घेणे किती व का आवश्यक आहे याची त्यांनी प्रकर्षाने जाणीव करून दिली .संस्थेचे संस्थापक सदस्य प्रविण सिंग तोवर यांनी सुद्धा त्यांच्या अनुभव कथना द्वारे उपस्थितांना मार्ग दर्शन केले. उपस्थितान्साठी काही लघुपटांचे प्रदर्शन करून त्यावर सर्वांगिन चित्रपट रसग्रहण अनुषंगाने निरिक्षनात्मक चर्चा सुद्धा प्रश्नोत्तरातुन करण्यात आली.

  त्याचप्रमाणे बीइंग आर्टिस्ट अकेडेमि ऑफ फ़िल्म अँड थिएटर आर्ट्स च्या संचालिका स्नेहा वासनिक यानी उपस्थितांना चित्रपट तसेच तत्सम माध्यमाच्या रीतसर शिक्षणानंतर कुठे कुठे आणि कोण कोणत्या क्षेत्रात, शासकीय संस्था, सरकारी कार्यालये व विभाग, अशासकीय किंवा खाजगी संस्था मधे करियर च्या संधी आहेत, कोण कोणत्या पदांवर नियुक्ती आहेत, त्याकरिता कश्या पद्धतीने अर्ज करावे, मिळणाऱ्या फेलोशीप्स, स्कॉलरशिप व इतर अर्थ सहाय्य व ते मिळवण्याची प्रक्रिया या विशेष बाबींवर अनमोल मार्ग दर्शन केले.

  सरते शेवटी कार्यशाळा आयोजक व फ़िल्म रील्स प्रॉडक्शन चे संचालक रूपेश सराट्कर यानी आपले काम, प्रवास, अनुभव याबाबत मनोगत व्यक्त करत आभार प्रदर्शन केले.या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कांडली परतवाडा येथील ज्येष्ठ नाट्य कलावंत अभिनेते आदरणीय रामकृष्ण सराट्कर, सौ.सुनीता सराट्कर यांचे विशेष सहकार्य व आशिर्वाद लाभले. त्याचप्रमाणे सौ.राखी सराट्कर ,सुखदेव राव रावरकर, पद्मा रावरकर, वीरेंद्र रावरकर, प्रतीक मुंदेकर यांचे सहकार्य लाभले.कार्यशाळेत आदित्य रावरकर, प्रणव सराट्कर, राणी रावरकर, स्वरांगी अमृतकर, गायत्री सराट्कर, अंबिका मुंदेकर, आनंदी सराट्कर, ईश्वर घोम, रौशनी सराट्कर, साक्षी रावरकर, अथर्व अमृतकर, पूजा सराट्कर, भावेश देवकर, जय सराट्कर, तसेच बाल कलावंत समर्थ रावरकर, अंशुल रावरकर आणि यश रावरकर यांनी उपस्थिती दर्शवली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या